रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.

 रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.

रयत शिक्षण संस्थेमध्ये भरती निघालेली आहे, यामध्ये 780 जागांसाठी भरती होणार आहे ,लगेच अर्ज करा. 

अर्ज सुरू होण्याची  तारीख -17/05/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख -22/05/2023

एकूण जागा- 780


पद आणि पदसंख्या

पद                           पदसंख्या

सहाय्यक प्राध्यापक       780

नोकरीचे ठिकाण - पुणे

ऑनलाइन अर्ज शुल्क रु.200 (दोनशे रु.) प्रति अर्ज जे परत न करणे  योग्य आहे.

      'रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.'

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी खालील कागदपत्रे सादर करावे

1) ऑनलाइन अर्जाची प्रिंट प्रत

2) गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र च्या सर्व साक्षांकित प्रती

3) मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित प्रती जमा करावेत.


       "  रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti."

तिसरी ,पाचवी ,आठवी , दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

    महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात .

         शाळेत प्रवेश घेतलेल्या पैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इयत्ता पाचवी नंतर आणि विशेषत: आठवी नंतर शाळा सोडतात ,हे एका सर्वेक्षण स्पष्ट झाले आहे .NNSO ने 2017- 18 मध्ये केलेल्या 75 व्या फेरीतील घरगुती सर्वेक्षणानुसार 6 ते 17 वयोगटातील शाळा बाह्य मुलांची संख्या जवळपास तीन कोटी बावीस लाखापर्यंत होती.

        या मुलांना शैक्षणिक व्यवस्थेत सामील करून घेण्याची आणि 2030 पर्यंत शाळाबाह्य  मुलांचे प्रमाण कमी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली, ज्याचे उद्दिष्ट शाळा पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत शंभर टक्के शाळा उपस्थितीचे प्रमाण आहे .देशातील सर्व मुलांना प्री स्कूल ते बारावीपर्यंत व्यवसायिक शिक्षणासह दर्जेदार सर्वसमावेशक शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश आणि संधी मिळतील याची हमी देण्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय प्रयत्न केले जातील याबाबत दोन प्रकरणांना प्राधान्य दिले जाईल.

          त्याचप्रमाणे तिसरी, पाचवी आणि आठवी तसेच दहावी आणि बारावी इयत्तेतील मुले एकही न चुकता परीक्षा देऊ शकतील. शाळेचा दिवस विविध कारणामुळे शाळेत जाऊ नये शकणाऱ्या मुलांना मोफत आणि दुरुस्त शिक्षणाचा लाभ मिळेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या विषयाला प्राधान्य देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे.

          

    'इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात .'

        "खुले आणि रिमोट "असलेल्या शाळाबाह्य मुलांसाठी पर्याय

शाळेत जाण्यास असमर्थ असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल अँड स्टेट ओपन स्कूल एक मुक्त आणि दुरुस्त शिक्षण कार्यक्रम राबवेल.

       औपचारिक शालेय प्रणालीच्या ग्रेड तीन ,पाच आणि आठच्या समतुल्य माध्यमिक शिक्षण कार्यक्रम तसेच इयत्ता दहावी ,बारावी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासारखे माध्यमिक शिक्षणा अभ्यासक्रम तसेच प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्धी कार्यक्रम, लागू केले जातील. नवीन राज्य मुक्त शाळा संस्था स्थापन करून आणि विद्यमान संस्था वाढवून प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषांमध्ये त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

              

         "इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात ."


जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

 जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

          महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय ,अधिसूचना, परिपत्रक इत्यादी द्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता नमूद केलेली आहे.

जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

    सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक 3 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे )दोन वर्षे इतकी शितलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 25 वर्षे )विचारात घेण्यात यावी.

      तसेच विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदासाठी देखील दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत विहित कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतके शिथिलता देय राहील.

      त्याचबरोबर ग्राम विकास विभाग , शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 नुसार मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेले /भरलेले आहेत, अशा उमेदवारांचे वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेत बसण्याचा अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये.  

     

      'जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.'

     पुढील GR पहा:

 

           राज्य शासनाच्या 43 विभागाअंतर्गत तब्बल पावणेतीन लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यात 75 हजार पदांची मेगा भरती केली जाणार आहे .भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आराखडा शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे.

      जिल्हा परिषदेतील गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय जीआर जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे. 

1) आरोग्य पर्यवेक्षक

2) आरोग्य सेवक (पुरुष)

3) आरोग्य सेवक (महिला)

4) औषध निर्माण अधिकारी 

5)कंत्राटी ग्रामसेवक 

6)कनिष्ठ अभियंता

7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी )

8) कनिष्ठ अभियंता( विद्युत )

9) कनिष्ठ आरेखक 

10) कनिष्ठ लेखा अधिकारी

11) माध्यम कनिष्ठ यांत्रिकी 

12) कनिष्ठ लेखाधिकारी 

13) कनिष्ठ सहाय्यक लिपीक 

14) कनिष्ठ सहाय्यक लेखा 

15) जोडारी

16) तारतंत्री

17) पर्यवेक्षिका

18) पशुधन पर्यवेक्षक 

19) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

20) यांत्रिकी

21) रिगमन 

22) लघुटंकलेखक

23) लघुलेखक (उच्च श्रेणी) 

24) लघुलेखक (निम्न श्रेणी) 

25) वरिष्ठ सहाय्यक लिपिक

26) माध्यम विस्ताराधिकारी (कृषी)

27) लघुलेखक  उच्च श्रेणी

28) वरिष्ठ सहाय्यक लेखा 

29) विस्तार अधिकारी( पंचायत )

30) विस्ताराधिकारी (शिक्षण)

31) विस्ताराधिकारी (सांख्यिकी)

 वरील पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे ,अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा. त्यामध्ये सर्व अभ्यासक्रमम सविस्तरपणे दिलेला आहे.

        " जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada."

महावितरण मध्ये भरती Mahavitaran Madhye Bharti 2023

 Mahavitaran Madhye Bharti 2023 

महावितरण मध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे...

Mahavitaran Madhye Bharti 2023

महावितरण मध्ये भरती Mahavitaran Madhye Bharti 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख- ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17/05/2023

एकूण जागा - 320


           पद                             पदसंख्या

      1) लाईनमन.                     291

      2)कॉम्प्युटर ऑपरेटर.          29

अटी व शर्ती

1)  वयोमर्यादा- 

18 वर्षे ते 30 वर्षे (मागासवर्गीयासाठी 5 वर्षे शिथिल क्षम)

2) उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.

3) कामाचे ठिकाण - अहमदनगर जिल्ह्यात कोठेही वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55 टक्के व मागासवर्गीयांसाठी 50 टक्के गुण आवश्यक. 'Mahavitaran Madhye Bharti 2023'

4) शैक्षणिक पात्रता-  दहावी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा आयटीआय.

5) कागदपत्र जमा करणे पूर्वी अर्जदाराने शासनाच्या www.appreceshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक.

6) उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र ,आयटीआय, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके जातीचे प्रमाणपत्र( लागू असल्यास ),आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक 16/ 5/ 2023 ते 17/ 5 /2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत या वेळेत आणावीत अपूर्ण कागदपत्रे माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

7) प्रशिक्षण संपल्यानंतर शिकवू उमेदवारांना कंपनीचे सेवेत घेणे बंधनकारक नाही. ''Mahavitaran Madhye Bharti 2023''

8) जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीचे काही भागांमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्णता जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे.

9) अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य 

पत्ता -अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि.कंपनी मर्यादित मंडळ, कार्यालय विद्युत भवन ,स्टेशन रोड ,अहमदनगर 414001


आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

 आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

सरळ सेवेने परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक - ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 2023

आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

महाराष्ट्र राज्यातील शासकीय ,वैद्यकीय ,दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ' क 'संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

       राज्यातील एकूण 4751 पदांपैकी तब्बल 4000 पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या 25 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन्यायालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

        'आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023'

         वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अं seतर्गत येणारी गट क परिचार्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

      रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक-

1) ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक- 10 मे 2023

2) ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक- 25 मे 2023

3) ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक- 10 मे 25 मे 2023

4)सामायिक परीक्षेकरिता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक-www. med -edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.

5) सामायिक परीक्षेचा दिनांक - www. med -edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.

वेतन श्रेणी 

सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व अधिनियमानुसार अनुज्ञेय भत्ते.


अधिपरिचारिकांची पदे - 3974

यामध्ये खुला -1954

अनुसूचित जमाती-321

अनुसूचित जाती-338

इतर- 1361

विविध पदे - 

प्रयोगशाळा सहाय्यक- 170

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 112

ग्रंथपाल -12

स्वच्छता निरीक्षक -9

इसीजी तंत्रज्ञ- 36

आहार तज्ञ- 18

औषध निर्माता- 169

ग्रंथसूचीकार -19

ग्रंथालय सहाय्यक -16

समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय)- 86

दूरध्वनी चालक -17

अंधारखोली सहाय्यक -10

किरण सहाय्यक 23

सांख्यिकी सहाय्यक 3

शिंपी 15

वाहनचालक 34

गृहपाल 16

व्यवसाय उपचार तज्ञ 7

अशा विविध पदांची जाहिरात संचालन्यायालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.med-edu.in/

     

    "आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023"


महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC HSC result date 2023

   महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC, HSC result date  2023

              दोन वर्षाच्या कोरोना नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाने पूर्वीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेण्यात आलेले आहेत .

          

महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC HSC resul date  2023

          परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तर पत्रिकांची तपासणी केली आहे ,सर्व उत्तर पत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरू झाली आहे, बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक 90% पर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे. 

      'महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC, HSC result date  2023'
       

           वेळेत निकाल लावल्यास पुढील प्रवेशाला विलंब होणार नाही ,याची खबरदारी एच. एस .सी आणि एस .एस .सी बोर्ड कडून घेतली जात आहे, त्यानुसार निकाल वेळेत लागावेत असे नियोजनही बोर्डाने केले आहे.

               बारावीचा निकाल मे अखेरीस जाहीर न झाल्यास 3 ते 4 जून पर्यंत तो निकाल लागेल ,असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

              त्यानंतर 6 ते 8 दिवसात म्हणजेच 10 जून पर्यंत दहावीचा निकाल लागावा अशीही तयारी बोर्डाने केली आहे.

           #   प्रवेश प्रक्रिया #

           यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे .त्यामुळे बारावी नंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे .त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे ,साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांची नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता बोर्ड घेत आहे.

       "महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC, HSC result date  2023"


       

शिक्षक भरती बाबत..


शिक्षक भरती बाबत..

  संच मान्यतेची लगबग सुरू, जुलैपासून शिक्षक भरतीला सुरुवात....
शिक्षक भरती बाबत..

शिक्षक भरती बाबत...


राज्यातील शालेय शिक्षकांची संच मान्यता आता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील माहिती जुळत नसल्याने ही संचमान्यता रखडली होती.

                विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम शाळा स्तरावर सुरू आहे .ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे .शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहाय वितरण 20 मे पर्यंत केले जाणार आहे, त्यानंतर शाळांना 30 जून पर्यंत बिंदू नामावली निश्चित करावी लागणार आहे.

      'शिक्षक भरती बाबत'..

अशी असेल प्रक्रिया : 

* विद्यार्थ्यांचे आधार जोडणीचे काम शाळा स्तरावर सुरू.

* कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार.

* शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहाय वितरण 20 मे पर्यंत होणार.

* शाळांना 30 जून पर्यंत बिंदू नामावली निश्चित करावे लागणार.

* शाळा व्यवस्थापनांना पहिल्या तिमाहीसाठी शिक्षक भरतीच्या पोर्टलवर 15 जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागणार.

* त्यानंतर रिक्त पदासाठी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, तसेच नियुक्तीसाठी शिफारस करणे आदी प्रक्रिया 20 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी लागणार. 

        असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

          

             "शिक्षक भरती बाबत"..

श्री राम गोवर्धन डोळे 

मराठी जोडशब्द व त्यांचे अर्थ : Marathi jodshbd v arth

मराठी जोडशब्द व त्यांचे अर्थ : Marathi jodshabd v arth

मराठी जोडशब्द व त्यांचे अर्

मराठी व्याकरणांमध्ये जोडशब्द हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जोडशब्द या घटकावर आधारित स्पर्धा परीक्षेसाठी दोन ते तीन प्रश्न विचारले जातात.

मराठी जोडशब्द वर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा


मराठी जोडशब्द व त्यांचे अर्थ 

जोड शब्द

अर्थ



अकरनकर

हट्टी, दुराग्रही

अकराळ विकराळ

भयंकर (अक्राळ विक्राळ)

अकांड तांडव

रागाने ओरड

अक्कल बाज

हुशार

अगट चिगट

मंद, आळशी

अगड तगड

क्षुल्लक वस्तू (चिकटसटरफटर)

अगड तबड

शिळेपाळे, जाडे भरडे अन्न

अगल्या बगल्या

आश्रित

अग्निपरीक्षा

अग्निदिव्य

अगापिछा

संबंधी

अग्निपात्र

इस्त्रीचे यंत्र

अग्नियंत्र

बंदूक, तोफ

अघळ पघळ

ऐस पैस, सैल

अंगत पंगत

मुलांचा एकत्र जेवणाचा प्रकार

अचकट विचकट

वाईट, अश्लील

अचक बोचक

गैर पद्धतीने, अस्ताव्यस्त

अचकल दचकल

वाईट अन्न

अचका विचका

गोंधळ, गुंतागुंत

अचका गचका

धसका, अपस्मार, फेफरे यांनी बसणारा हिसका

अचट बोचट

अर्धे मुर्धे, कमी जास्त

अचडे बचडे

लाडके मूल

अचरट पचरट

कोरडे, बेचव

अजात शत्रु

शत्रू नसलेला

अटक चटक

चेष्टा, खेळ

अटक मटक

खेळ

अटपा आटप

आवराआवर, निरवानिरव

अटाअट

वाण, उणीव, टंचाई

अटापीट

छळणूक, गांजणूक

अटांग पटांग

लांबलचक

अठोनी वेठोनी

पीळदार

अटोकाट

अत्यंत

अडका अडकी

गुंतागुंत, विघ्न

अडगुण बडगुण

फालतू वस्तू

अडप झडप

चोरून मारून, लपून छपून

अडवा तिडवा

वाकडा तिकडा, बाकदार

अडगुले मडगुले

मुलांचे गाणे

अडपता दडपता

देखरेख करणारा

अडप दडप

धाक, वचक

अडोशी पडोशी

जवळपासचा, शेजारचा

अढा वेढा

आडकाठी, प्रतिबंध

अढेवेढे

वाकडे तिकडे मुद्दे, अळेपिळे

आणिबाणी

ऐनवेळ अतिशय लहान कण

अणुरेणू

देवघेव, फेरफार

अदलाबदल

मोठ मोठे वीर

अतिरथी महारथी

सुवासिक फुलांचे सत्व

अत्तर गुलाब

जास्तजास्त

अधिकाधिक

जास्त कमी

अधिक उणे

(अर्धे मुर्धे) कमी जास्त

अर्धा मुर्धा

लबाडी, घोटाळा

अफरा तफर

अव्यवस्थित

अबर गोबर

बेचव, नीरस

अबर चबर

आळ, आरोप

अभांड कुभांड

शांती, समृद्धी

अमन चमन

जेवण व पाणी (निर्वाहाचे साधन)

अन्नपाणी

बडे लोक

अमीर उमराव

कोणी एक

अमूक तमूक

कोणीतरी व्यक्ती

अयबू गयबू

अन्न व कपडे इ.

अन्न वस्त्र

आळीपाळी, अदला बदली

अरगी पारगी

अवघड जागा, कडा

अरडी दरडी

परडी

अरडी परडी

अलीकडे, पलीकडे

अरता परता

बेचव, नीरस, रुक्ष

अरब चरब

आसपास, आजुबाजूला

अरस परस

तात्पुरते

अरळतरळ

भाषण (तयारी नसलेले भाषण), अप्रस्तुत भाषण

अराळ फराळ

कोणत्याही रीतीने

अर्था अर्थी

कोणीही, भलता सलता

अलबलीत गलबलीत

ढिला, मंद

अरे तुरे

सलगीचे संबोधन

अलांडा बलांडा

अडथळा, विघ्न

अलाई बलाई

दुःख, त्रास

अवडक चवडक

पसारा, गोंधळ

अवड चिवड

अव्यवस्थित पसारा

अवडा देवडा

अडवा तिडवा, वाकडा तिकडा

अवती भवती

आजुबाजूला

अवळ चवळ

अर्धवट

अवाई तवाई

संकट

अशीतशी

किरकोळ, क्षुल्लक

अष्टावक्र

विद्रूप, कुरूप

अष्ट पुत्र

आठ मुले

अष्टमांश

आठवा हिस्सा

अष्ट पैलू

हुषार, कला जाणणारा

अष्टौप्रहर

रांत्रदिवस, सतत

असुळ विसुळ

अस्ताव्यस्त, अव्यवस्थित

अस्ती नास्ती

काय आहे, काय नाही ते

असते नसते

अप्रासंगिक

अहाच वहाच

वरवर, दिखाऊ

अहद तहद

या टोकापासून त्या टोकापर्यंत

अळा पिळा

मुरडा, पिरगळा

आखोआख

मूळ किमतीने

आखाडखाना

शस्त्रागार, तालीमस्वाना

आकाश पाताळ

सर्वत्र

आगर डोंगर

सरहद्द, आवार

आगा पिछा

मागचा पुढचा भाग

आगत स्वागत

सत्कार, पाहुणचार

आंगतपंगत (अंगत पंगत)

मुलांचा एकत्र भोजनाचा प्रकार

आई-बाप

आईवडील, पालक

आगळा वेगळा

अप्रतिम

आगे मागे

पुढे मागे

आचार विचार

नियम, शिस्त

आटक साटक

मुलांचा एक खेळ

आटा पिटा

खटाटोप

आटिवेटी

श्रम, कष्ट

आटेविटे

आठेविठे, आळेपिळे

आटपाट

ठामपणा, पक्केपणा

आटपाटनगर

कोणते तरी एक शहर

आटापाणी

पीठ व पाणी, रोजचा शिधा

आटोकाट

पराकाष्ठेचा, अत्यंत, पूर्ण

आट्या पाट्या

एक महाराष्ट्रीय खेळ

आणिबाणी

संकट प्रसंग

आदळ आपट

आदळणे व आपटणे, आपटा आपटी

आनंदी आनंद

खूप आनंद

आपट धोपट

आपटणे, आपटा आपटी

आंबट गोड

आंबट व गोड यांचे मिश्रम

आबड धाबड

ओबड धोबड, बेडौल

आबळा गोबळा

सर्व दिशास व्यापून असणारा

आबादी आबाद

भरभराट

आंबट चिंबट

आंबट

आयात निर्यात

आवक जावक

आयाबाया

शेजारणी पाजारणी

आवड निवड

पसंती, आवड नावड

आमने सामने

समोरा समोर

आवळे जावळे

जुळे

आरोह-अवरोह

चढ-उतार

आलीगेली

नफातोटा, जमाखर्च

आवट चावट

भसते सलते

आवती भोवती

आजूबाजूला, आसपास

आस्कळ विस्कळ

ऐसपैस

आस्कार हुस्कार

हुंदके देणे, श्वासोच्छ्वास

आशानिराशा

इच्छा-अनिच्छा

आहाळबाहाळ

संपूर्ण, विस्तीर्ण

आळसमळस

ऐसपैस

आळाटाळी

ढिलाई, चेंगटपणा

आळाटोळा

अंदाज

इकडे तिकडे

आजुबाजूला, येथेतेथे

इवले इवले

लहान

इन मिन साडेतीन

छोटा संसार

इमाने इतवारे

प्रामाणिकपणाने, एकनिष्ठेने

इडा पिडा

दुःखे, संकटे

उकसाबुकसी

ओक्साबोक्षी

उखळा उखळ

विस्कटणे, मोकळे करणे

उखाळी पाखाळी

वैगुण्य, दोष, कमीपणा

उगरा बागरा

उग्र, क्रूर, भयानक

उगवित पागवित

सोईसोईने, थोडेथोडे

उघडा बोडका

खुला, मोकळा, नागवा

उघड वाघड

उघडपणे, प्रसिद्धपणे

ऊचकळ्या बुचकळ्या

बुडत्या माणसाच्या पाण्यातील गटांगळ्या

उचका उचक

घाईने ओढणे, फसविणे

उचमपचम

उठाठेव

उचलबांगडी

हकालपट्टी करणे

उचला उचल

घाईने सामानाचे स्थलांतर करणे

उजळ पाजळ

स्वच्छ, सतेज

उजवा डावा

फरक

उजूबुजू

आदर, मान, मर्यादा

उटाउटी

उठाउठी, तात्काळ, त्वरेने

उठसूट

कारणाशिवाय करण्याची क्रिया

उठाठेव

खटपट

उडतउडत

अस्पष्टपणे

उडवा उडवी

टाळाटाळी, उधळपट्टी

उतळपातळ

गप्पा, प्रौढी



'मराठी जोडशब्द व त्यांचे अर्थ : Marathi jodshabd v arth'

उत्तरोत्तर

क्रमाक्रमाने, हळूहळू

उतळपातळ

थोडेथोडे

उन्हातान्हाचा

भर दोन प्रहरचा

उधळ माधळ

उधळेपणा

उधार उसनवार

बिनव्याजी कर्ज

उपज निपज

जन्म आणि वाढ, उदय आणि प्रगती

उपासतापास

कडक व्रत, व्रतनियम

उरलासुरला

शिल्लक राहिलेला

उलगा उलग

आवराआवर, समाप्ती

उलाघाल

उलाढाल, क्रांती

उलटा पालटा

उलथा पालथा, गोंधळ

उठता बसता

वेळी अवेळी

उष्टे खरकटे

जेवणानंतर पानात राहिलेले

उसने पासने

उसनवारी, उधारी

ऊन पाऊस

सूर्यप्रकाश व पाऊस

ऋषीमुनी

साधूसंत

एकट दुकट

एखाद दुसरा, एकटाच

एकनिकी

एकी, जूट

एकमेक

परस्पर

एकमेळ

ऐक्य

एकांती लोकांती

गुप्त किंवा प्रकट, खाजगी किंवा सार्वजनिक

एकलकोंडा

एकांतप्रिय

एडगुळ बेडगुळ

ओबडधोबड

एरडबेरड

बेडौल

ऐशआराम

चैन, सुख, ऐष आराम

ऐलपैल

या व त्या बाजूचा

ऐलतीर पैलतीर

या व त्या बाजूचा किनारा

ऐसपैस

विस्तीर्ण, प्रशस्त

ओकसाबोकशी

मोठ्याने हेल काढून रडणे

ओघळ निघळ

वेडा वाकडा प्रवाह

ओढाओढ

खेचाखेच, गर्दी

ओढाताण

पैशाची टंचाई

ओढून ताणून

कसेतरी, कष्टाने

ओबड धोबड

वेडेवाकडे, बेढव

ओवळा सोवळा

अपवित्र-पवित्र

ओळख पाळरव

परिचय

औडक चौडक

ओबडधोबड, लहान मुलांचा खेळ

औरस चौरस

सभोवार, भोवती

औषध उपचार

वैद्यकीय उपचार

अंखण पंखण

धान्याप्रमाणे पसरणे

अंगकाठी

अंगाची ठेवण, देहयष्टी

अंथरूण पांघरूण

बिछाना व पांघरायचे वस्त्र

अंधार कोठडी

एकांत वासाची शिक्षा देण्याची खोली

अंडाळ बंडाळ

अव्यवस्था, गैरसोय

कडनिकड

निकडीचा प्रयत्न

कडाफोड

आदळ, आपट

कच्ची बच्ची

लहान मुले

कडी कोयंडा

दाराची कडी

कडी कुलपे

दाराची कडी व कुलूप

कमी अधिक

कमी जास्त

कडे लोट

शिक्षा म्हणून डोंगर कड्यावरून ढकलणे

कपडालत्ता

कापडचोपड, वस्त्र, कापड

कडोकडी

जोराने, नेटाने

कमजादा

कमी जास्त, कमी अधिक

करार मदार

वचन, बोली

कर्मकांड

धर्मकर्म

कर्मयोग

दैव, योगायोग

कर्मकथा

दुःखद कहाणी

कर्मकटकट

कंटाळवाणे, तापदायक

कर्मसंन्यास

कर्माचा त्याग

कर्ण कटू

कर्कश, कठोर

कलाकौशल्य

कलाकुसर, कलेत नैपुण्य

कर्मधर्म

वर्तन, कृत्य

कसाबसा

मोठ्या कष्टाने, प्रयासाने

कसकसणे

अंग दुरवून येणे

कहिबहि

कधीमधी, कधीतरी

कागद पत्र

पत्र, चिठ्ठी इ.

काऊ-चिऊ

कावळा चिमणी, लहान सहान

काट कसर

काटाकाट, खर्च कमी करणे

काटे कुटे

बारीकसारीक लाकडे, अडथळा

काटेकोर

बारीक, सूक्ष्म, व्यवस्थित

काथ्याकूट

निरर्थक चर्चा, वाद

कानाडोळा

दुर्लक्ष

कानामात्रा

अक्षर चिन्हे

कांदा भाकरी

जेवण, गरिबांचे जेवण

कानीकपाळी

अरवंड (ओरडणे)

कानाकोपरा

सर्वत्र, कानाकोचा

काबाडकष्ट

मेहनत, श्रम

काम काज

लहान मोठे काम

काडी-कुटका

गवताचा तुकडा, अल्पशी गोष्ट

कामधंदा

उद्योग

कामचलाऊ

तात्पुरता उपयोगी पडणारा

कामचुकार

काम चुकविणारा

कामसाधू

स्वार्थी

कायदा कानून

न्याय

कार्यकर्ता

लोकांची सेवा हौसेने करणारा

कार्यतत्पर

कार्यात निमग्न

कालवा कालव

ढवळा ढवळ, घोटाळा

कालत्रयी

कधीही नाही

काल पुरूष

यम

कावरा बावरा

भयभीत, गोंधळलेला

काळासावळा

सावळा

काळ झोप

मृत्यूच्या वेळची झोप

काळरात्र

भयंकर संकटाची रात्र

काळवेळ

वेळकाळ, समय

काळ पुरूष

यम, त्यासारस्वा क्रूर पुरुष

काही बाही

थोडेसे, भलतेच

किडूक मिडूक

बारीक सारीक दागिने

किडा मुंगी

जीवजंतू

कुच कामाचा

अगदी निरुपयोगी

कुजबुजणे

हळूहळू बोलणे

कुरबुर

धूसपूस, तंटा

कुल परंपरा

चाल, रीत

केरकचरा

केराप्रमाणे निरुपयोगी पदार्थ

केरकसपट

अगदी क्षुल्लक वस्तू

केर पोतेरे

झाडलोट, पाणी भरणे इ.

केरवारे

केरकचरा

केरपाणी

झाडलोट

कोड कौतुक

कौतुक, लाड, आवड

कोकण पट्टी

कोकण किनारा

कोलवा कोलव

चुकवा चुकव, टाळाटाळ

खटाटोप

मोठी तयारी, बेत

खबरबात

समाचार, बातमी

खडी साखर

खडे जमलेली साखर

खरेदी विक्री

माल खरेदी करून तो परत विकणे

खडा जंगी

जोराचे भांडण, लढाई

खाचखळगे

चढउतार, विषमता, खाचखोच

खाणाखुणा

संकेत, आठवणीचे चिन्ह

खातर जमा

खात्री, विश्वास

खालोखाल

योग्यतेने किंचीत कमी

खापरतोड

निपणतूचा/पणतूचा मुलगा (नातवाचा किंवा नातीचा नातू)

ख्याली खुशाली

स्वस्थता, गंमत

खाऊन पिऊन

तृप्त, खाऊन पिऊन समाधानी

खाणे पिणे

अन्न, भोजन, खाद्य पदार्थ इ.

खारीक खोबरे

सुका मेवा

खेळी मेळी

सलगी

खेळ खंडोबा

नाश

खोटेनाटे

असत्य

खोगीर भरती

व्यर्थ लोकांची भरती

गप्पागोष्टी

रिकामपणाच्या गोष्टी

गगन मंडल

आकाशाची पोकळी

गणगोत

नातेवाईक, सोयरेधायरे

गल्लीबोळ

लहान रस्ता

गडबड गोंधळ

धांदल

गद्धे पंचविशी

तारुण्याचा काळ

गरम नरम

फार थंड व फार गरम नसलेले

गण मैत्री

जन्म पत्रिकेतील गणांमधील मैत्री

गर्भ श्रीमंत

जन्मापासून श्रीमंत

गरीब गुरीब

गोरगरीब

गंगा जमुना

अश्रू

गंगा भागीरथी

वयस्क विधवा, गंगेचे पवित्र पाणी

गज-घंटा

हत्तीच्या गळ्यातील घंटा

गंमत जंमत

चैन, मजा

गृहकलह

घरगुती तंटा

गाईगुरे

गुरे

गाई वासरू

गुरे

गाठ भेट

भेटी

गाडी-घोडा

वाहन

ग्राम देवता

गावचा प्रमुख कुलदेव

ग्रहगती

ग्रहांचा वाईट परिणाम

ग्रामपंचायत

गावची व्यवस्था पाहणारी संस्था

गारेगार

अतिशय गार

गुरू-दक्षिणा

विद्याभ्यास संपल्यावर गुरूस द्यावयाची देणगी

गुरू-संप्रदाय

गुरुमार्ग, गुरूने घालून दिलेली परंपरा

गुंता गुंत

घोटाळा, गोंधळ

गुरे ढोरे

गुरे

गुजगोष्ट

गुपित

गैरवाजवी

अयोग्य, अन्याय

गैर फायदा

अयोग्य फायदा

गैर समजूत

चुकीची समजूत

गैर सोय

अडचण, त्रास

गैर मसलत

मूर्खपणाचा बेत

गोर गरीब

गरीब व दरिद्री

गोरा गोमटा

सुंदर रूपाचा

गोब्राह्मण

गाय आणि ब्राह्मण, गरीब ब्राह्मण

गोरा मोरा

पांढरा पडलेला

गोरक्षण

कसायापासून गाय वाचविणे

गोडी गुलाबी

भलेपणा, मैत्री

गोड धोड

गोडाचे जेवण

गोपाळकाला

सर्वांचे जेवण्याचे डबे एकत्र करणे

गोळाबेरीज

तात्पर्य, सारांश

गोरापान

अतिशय गोरा

गौडबंगाल

लबाडी, युक्ती, रहस्य

घरदार

घर व संसार

घर कोंबडा

नेहमी घरात राहणारा

घर बार

घरदार, प्रपंचाचा पसारा

घायकुती

उतावळेपणा

घाई गर्दी

अगदी गडबड, गर्दी

घातपात

ठार मारणे, नाश

घाई गडबड

अगदी गडबड, घाई घाईने

घुसळ खांब

दही घुसळण्यासाठी रवी ज्याला बांधतात तो खांब

घेवाण देवण

व्यवहार

घोडा गाडी

घोड्याची गाडी

घोडा मैदान

परीक्षेची कसोटी

घोडे बैल घो

घोडे व बैल

डचूक

अक्षम्य चूक

घोडकुदळ

उपवर झालेली पण लग्न न झालेली मोठी मुलगी

चकडमकड

सोंगढोंग, चालढील

चकनाचूर

सत्यानाश, नायनाट, चकाचूर, पूड, भुगा

चकमकर

युक्त्या , डावपेच

चक्का चक्की

उघड भांडण, हमरी तुमरी

चक्रपाणी

सुदर्शन चक्र धारण करणारा विष्णू

चक्रीपुराण

एकाच बैठकीवरून अनेकांनी सांगितलेले पुराण

चट्टामट्टा

फडशा, वाऊन संपविणे

चढउतार

कमी जास्त

चटणी भाकरी

गरीबांचे साधे जेवण

चंद्रप्रभा

एक ओषधी गोळी

चंद्रग्रहण

चंद्रास लागलेले ग्रहण

चंद्रमणी

एक काल्पनिक रत्न

चपलगती

वेग

चरणरज

पायधूळ

चरणतळ

तळपाय

चरणामृत

पायांचे तीर्थ

चलनवलन

चालणे, वागणे, हालचाल

चलबिचल

अस्थिरता

चवढव

गोंधळ, भानगड

चवल्यापावल्या

कच्चीबच्ची; मोड

चंबूगबाळे

भांडीकुंडी, सामानसुमान

चहाफराळ

चहा व नास्ता

चाटकेबुटके

खेळण्यातील भांडीकुंडी, चुलबोळकी

चांडाळ चौकडी

चार वाईट माणसांचा समुदाय

चारा पाणी

गुरांचे खाणे

चाल चलन

आचार, वर्तन, वागणूक

चांगले चुंगले

चांगलेसे

चिपुटचिंगळी

चिटपाखरू

चिरगुट पांघरूण

अथरापांघरायचे

चिवून चावून

काटकसरीने

चिठी (चिठ्ठी) चपाटी

लहानसे पत्र

चिरी मिरी

लहानशी लाच, बक्षिशी

चिरे बंदी

घडीव दगडाचे बांधकाम

चिली पिली

मुले बाळे

चिरकाल

दीर्घ काळ

चुकूनमाकून

निर्हेतुकपणे

चुरचोंबडा

वटवट्या

चुडेदान

सौभाग्य

चुकला माकला

चुकून राहिलेला

चुनखडा

चुन्याचा खडा, निवडक रत्न, चपळ

चूकभूल

विस्मरणाने झालेला दोष

चेंगराचेगंर

चेपाचेपी

चेंदामेंदा

चुराडा, नाश

चेष्टा कुचेष्टा

टवाळकी

चेष्टा मस्करी

थट्टा

चोरूनमारून

लपूनछपून

चोळामोळा

चुरडणे

चोरी चपाटी

चोरी, दरोडा

चोर बीर

चोर वगैरे, चोरचिलटे

चोरी लबाडी

खोटेपणा, कपटीपणा

छान छोकी

डामडौल, दिमाख

छिन्न विच्छिन्न

छिन्न भिन्न, अस्ताव्यस्त

छेलछबीली

नखरेबाज, देखणा

छोटा मोठा

लहान मोठा

जमीन जुमला

खेडेगावातील जमीन

जड जवाहीर

सोने, रत्ने इ.

जनरूढी

लोकांची चाल, रीत

जन्मकुडाळ

कुचेष्टा करणारा

जपजाप्य

धार्मिक कृत्य, जपतप

जंतरमंतर

जादूटोणा

जन्म मरण

जन्म मृत्यू, जनन मरण

जन्म सावित्री

जन्मसवाशीण

जमीन दोस्त

सर्वस्वी नाश झालेला

जयस्तंभ

स्मारक म्हणून उभारलेला खांब

जलप्रलय

सर्व पृथ्वी पाण्यात बुडून जाते तो काळ

जसा तसा

जसा येईल तसा, कसाबसा

जय विजय

विष्णूचे दोन द्वारपाल

जय पराजय

जीत व पराजित, हार जीत

जन जागरण

जन जागृती

जगजाहीर

प्रसिद्ध

जन प्रवाद

बाजारगप्पा, जनरीत

जन रीती

लोकांची प्रवृत्ती

जन्मगाठ

जन्मभर टिकणारा संबंध

जन्मदरिद्री

जन्मापासून दरिद्री

जय गोपाळ

नमस्काराचा पर्याय शब्द

जल क्रीडा

जलविहार

जातपात

जातगोत, जात जमात

जाती स्वभाव

जन्म स्वभाव, जातीनुसार स्वभाव

जाड जुड

लढ, धष्टपुष्ट

जाळपोळ

नासधूस

जाबजबाब

बोलण्याचे चातुर्य

जाणता अजाणता

कळत नकळत

जातकुळी

जात, वंशासंबंधी माहिती

जिरवाजिरव

निरवा निरव, छपवा छपवी

जीवश्च कंठश्च

जीवलग

जीव जंतु

लहान किडा

जुलूम जबरी

बलात्कार, जुलूम

जुना पुराणा

फार दिवस वापरलेली वस्तू, जुनवट, जीर्ण

झगडा बिगड़ा

वादविवाद, भांडण, तंटा

झाडे झुडपे

झाडांचा समुदाय (झाड झाडोरा)

झाड लोट

झाडून साफ करणे

झाड पाला

औषधाच्या उपयोगी पाला, वनस्पती

झाकपाक

जेवणानंतरची उरली सुरली कामे

झुंजुक मुंजुक

पहाटेचा संधी प्रकाश, झुंजुमुंजू

झोंबा झोंबी

ओढाओढ, हिसकणी

टंगळ मंगळ

टाळाटाळ, चुकवा चुकव, बेपर्वाई

टकामका

निश्चलपणे, चकित होऊन

टकेटोणपे

अडथळे, संकटे

टाणा टोणा

जादुगिरी, मंत्रतंत्र

टापटेप

उंचवटे, टेकाडे

टापटीप

सुव्यवस्था

टापस टीप

पुरेपूर, प्रसंगानुरूप

टाळाटाळ

भूलथाप, चालढकल

टोले जंग

मजबूत, बळकट

टोळभैरव

उडाणटप्पू, रिकामटेकडा

ठाकठीक

सुव्यवस्था, नीटनेटका, ठीकठाक

ठाकून ठोकून

प्रसंगानुरूप

ठाला ठेल

भरगच्च, खच्चून भरलेले

ठाव ठिकाणा

पत्ता, मागमूस

ठायी ठायी

ठिकठिकाणी

ठेवरेव

भांडवल, संचय

ठोकतापीर

भांडखोर

डरांव डरांव

बेडकाचे ओरडणे

डगमग

लटपट, डळमळीतपणा, अस्थिरता

डचमळणे

रखळबळणे, वर उसळणे

डबडबणे

अश्रृंनी भरून येणे

डायाडोल

भयभीत

डावपेच

खेळातील रखुबीदार डाव

डावाउजवा

व्यवहारोपयोगी चातुर्य

डाळ भात

साधे जेवण

डागडुगी

लहानसहान दरुस्ती

डाम डौल

डौलदार, छानछोकी, थाटमाट

डोळे मोड

नेत्र संकेत

डोंगर दरी

डोंगर व दरी असलेला भाग

डोंगर पठार

सपाट प्रदेश

ढकला ढकली

विनाकारण वेळ घालविणे

ढवळा ढवळ

उलाढाल, गोंधळ

ढवळा पवळा

बैलांची जोडी

ढाल ढकल

चालढकल, दिरंगाई

ढाल-तलवार

लढाईची (मारामारीची) साधने

तन मन धन

सर्वस्व, शरीर मन व संपत्ती

तप्तमुद्रा

दीक्षा घेताना तांब्या पितळेच्या मुद्रा तापवून अंगावर चिन्हे उमटवितात

तर्क ज्ञान

अनुमान करण्याची शक्ती

तर्क कौशल्य

कल्पना करण्याचे चातुर्य

तडका फडकी

झटापट, तात्काळ, तरकाफरकी

तडफडाट

चडफडाट

तरवार बहादुर

शूर, रणगाजी (तलवार - तरवार)

तडजोड

सलोखा, समेट

तप्तशुल

तापविलेला सूळ

तर्क वितर्क

कल्पना, अनुमान, अंदाज

तर्क विद्या

वादविवादपटुता, अंदाज करण्याची कुशलता

तंटा बखेडा

बोलाचाली, भांडण

ताट वाटी

जेवणाची तयारी

ताकडा तुकडा

लहान मोठा तुकडा

तारंतार

तंतोतंत, बरोबर

तारतम्य

श्रेष्ठ कनिष्ठ भाव, बरेवाईटपणा

ताळमेळ

देश काल इ. चा मेळ

तान मान

योग्य व अनुकूल परिस्थिती

तांब्या पेला

पाणी पिण्यास लागणारी भांडी प्र

ताजा तवाना

फुल्ल, टवटवीत

तिखट मीठ

मीठ मसाला

तिरसट

चिडखोर

त्रिमूर्ती

ब्रह्मा, विष्णु, शंकर या तिघांचा मिळून झालेली मूर्ती

त्रिभुवन

स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक

त्रिवर्ग

तिघेजण, उत्कर्ष, साम्य, हास ह्या तीन अवस्था, तीन पुरुषार्थ

तेल फणी

केस नीट करणे, केस विंचरणे

तेजःपुंज

तेजस्वी

तेरी मेरी

हमरी तुमरी, अरेतुरेवर आलेले भांडण

तैल चित्र

तेलाच्या रंगांनी काढलेले चित्र

तोळामासा

थोड्या प्रमाणात

तोडमोड

किडुकमिडुक, मोडकी-तोडकी

त्रेधा तिरपीट

ओढाताण, तारांबळ

थंतर मंतर

जादूटोणा, मंत्रतंत्र

थकला भागला

दमलेला

थय थय

आनंद, मौज किंवा राग व्यक्त करण्यासाठी नाचणे

थांग पत्ता

सुगावा, ठाव

थातूर मातुर

अर्थहीन, निरर्थक

थाटमाट

डौल, डामडौल

थोडा थोडका

अल्प प्रमाणात

दगडधोंडा

दगड

दगाबाजी

कपट, ठकबाजी

दगेबाज

अप्रामाणिक

दगा फटका

कपट, लबाडी

दम छाट

श्वासोच्छ्वास निरोधनाची शक्ती

दमदाटी

धाकदपटशा

दळण कांडण

मोलकरणीची घरातील ढोबळ कामे

दहीभात

दह्यात कालविलेला भात

दंगामस्ती

गडबड, गोंधळ

दडप शाही

अरेरावी, जुलमी अंमल

दरी दरडी

उंच सखल

दस्तऐवज

हक्क पत्र, प्रमाण पत्र

द-याखो-या

मोठा विस्तार

दर्या सारंग

नावाडी, खलाशांचा नायक

दस्तस्वत

सही

दळण वळण

परिचय, व्यवहार

दृष्टादृष्ट

नजरानजर, परस्पर दर्शन

दंत कथा

लोककथा, शास्त्रप्रमाणविरहित

दाणा पाणी

गोष्ट निर्वाह, पोट भरणे

दाणा गोटा

धान्यधुन्य, डाळी

दाणादाण

सैरावैरा पळणे, पांगापांग

दान धर्म

परोपकाराची धार्मिक कृत्ये

दानशूर

दानवीर, दान देण्यात शूर

दावेखोरी

शत्रुत्व, वैर

दान धर्म

पुण्यासाठी कलेले दान

दाग दागिने

अलंकार

दान पात्र

दान देण्यास योग्य

दातकडी

दातखिळी

दिवाबत्ती

दिवे

दिलदारी

उदारता

दिलहवाल

अस्वस्थ

दिवसा ढवळ्या

भरदिवसा

दिवाळी दसरा

सणाचा दिवस

दीन दुःखी

दीन दुबळे, केविलवाणा, अनुकंपनीय

दिवस रात्र

सतत

दुजाभाव

मनाचा दुटप्पीपणा, आत एक बाहेर एक अशी वृत्ती

दूध दुभते

दूध, दुभते पदार्थ

दूरदृष्टी

कुशाग्र बुद्धी

दुराचरण

निंद्य, वाईट वागणूक

दूध भात

दूध आणि भात, मेजवानीच पण विनयाने उल्लेख करण्याचा शब्द

देवाण घेवाण

देवघेव, व्यवहार

देवधर्म

धार्मिक कार्य, नवस करणे, देवपूजा

देवदानव

सुरासुर

देव देवता

देवता, परमेश्वर

देव दर्शन

देवाचे दर्शन

देव ऋषी

देवर्षी, नारद

दैवगती

नशीब

धकाबुकी

धक्का बुक्की, धक्के व बुक्के यांचा मार

धडधाकट

शाबूत, अव्यंग

धनदौलत

संपत्ती, मालमत्ता

धरपकड

गुन्हेगार, चोर यांना पकडण्याची क्रिया

धरसोड

चंचलता, अस्थिर

धष्टपुष्ट

गुबगुबीत, निकोप, धट्टाकट्टा

धरतीमाता

भूमाता, जमीन

धनुष्य बाण

ऐतिहासिक काळातील लढाईचे साधन

धर्मकर्म

आचार, वर्तन

धर्मयुद्ध

न्याय युद्ध, निष्कपट युद्ध

धनधान्य

संपत्ती, घरदार, मालमत्ता इ.

धागादोरा

संबंध, पत्ता

धावाधाव

पळापळ, घाईने इकडे तिकडे पळणे

धान्य धुन्य

भात, गहू, ज्वारी इ. धान्य

ध्यानीमनी

अंतःकरणातील सर्व अवस्था व्यापणे

धावत पळत

अतिशय वेगाने, लवकर

धांगड धिंगा

गोंधळ, दांडगाई

धुमधडाका

गोंगाट, दणदणाट

धुमाकूळ

गोंधळ, दंगामस्ती

धेडगुजरी

अनेक भाषांची खिचडी

धोपट मार्ग

सरळमार्ग, परंपरागत चालत आलेली रीत, पद्धत

धोतर जोडी

दोन धोतरांची एक जोडी

नखशिखात

आपादमस्तक, सर्व शरीरभर, पायाच्या नवापासून शेंडीच्या अग्रापर्यंत

नंगानाच

निर्लज्जपणाचे वर्तन

नजर बंदी

जादुगिरी, हातचलाखी

नटूत थटूत

सजून, नट्टापट्टा करून

नंदीबैल

संकेताप्रमाणे वागणारा

नन्नाचा पाढा

प्रत्येक गोष्टीला नकार देणे

नरकुंजर

गणपती, नरश्रेष्ठ

नफातोटा

फायदा व नुकसान

नदी नाले

लहान मोठे पाण्याचे प्रवाह

नगरवासी

शहरात राहणारे

नकार घंटा

नाकबूल करणे

नटवा नटवी

नखरेबाज

नवरा बायको

दंपती, पती पत्नी

नवनवती

तारुण्याची आरंभदशा

नवरा नवरी

नवदंपती, वर आणि वधू

नगार खाना

वाद्यांचा कारखाना, देऊळ

नव वधू

नवी नवरी

नव भूमी

नवीन भूमी, नवीन ठिकाण

नाव लौकिक

प्रसिद्धी, कीर्ती

नाक कान

अवयव

नामो निशान

अस्तित्व, नावकुल, संबंध

नाच गाणे

नाचगाण्याचा कार्यक्रम

न्याय नीती

न्याय निवाडा, न्याय, खरेपणा

नावगाव

नाव निशाण, संबंध, नावकुल

निमक हराम

कृतघ्न, बेईमान

निमक हलाल

कृतज्ञ, विश्वासू

निशाणबाजी

नेम मारणे, वेध

निवासस्थान

घर

निम्माशिम्मा

अर्धेमुर्धे

निसर्ग रम्य

निसर्ग सौंदर्य, स्वाभाविक सौंदर्य

निसर्ग प्रेम

निसर्गावरील प्रेम

निज मुख

स्वतःचे तोंड

निळे काळे

निळा व काळा रंग मिळून झालेला हिरवा रंग, निस्तेज

निळा शार

निळे शहर (शार-शहर)

निळा सावळा

सावळा

नेत्रपल्लवी

नेत्र संकेत, खुणेची भाषा

नोकर चाकर

सेवक, चाकर, दास

नोक झोक

नखरा, थाटमाट

पडझड

मोडतोड

पही पाहुणा

वाटसरू, अतिथी, पै पाहुणा

पक्षपात

कैवार

पशुपक्षी

प्राणीमात्र

पळवा पळवी

पळापळ, धावाधाव

पहिला वहिला

प्रथमचा

पदोपदी

पावलो पावली, क्षणोक्षणी, वारंवार

पदर मोड

स्वतः खर्च करून

पंचयज्ञ

पांच प्रकारचे यज्ञ, ब्राह्मणाने करावयाचे यज्ञ

पाऊल वाट

अरूंद वाट, पायवाट

पालापाचोळा

कचरा, निरर्थक वस्तू

पाटपाणी

जेवणाची तयारी

पांढरपेशा

उच्च वर्णीय

पाताळयंत्री

गूढ, कारस्थानी

पानसुपारी

विड्याचे साहित्य, पोस्त, लांच

पायपोस

चप्पल, पादत्राण

पायगुण

शुभाशुभ शकुन

पांढच्या पायाचा

अपशकुनी, वाईट पायगुणाचा

पांढराफटक

निस्तेज

पालनपोषण

संरक्षण, सांभाळ

पावलोपावली

वेळोवेळी, पदोपदी

पाच पन्नास

थोडेसे

पाने फुले

देवाच्या पुजेसाठी फुले व पाने

पाऊस पाणी

पाऊस, पीक इ. पर्जन्यमान

पांढरा शुभ्र

अतिशय पांढरा

पालुपद

वारंवार म्हणणे, ध्रुपद

पाहुणा राउळा

पै पाहुणा, पाहुणा बिहुणा, पाहुणा

पाठोपाठ

पाठीमागून, मागोमाग, लागोपाठ

पास नापास

निकाल

पाने बिने

पाने इ.

पांढरा कावळा

अप्राप्य वस्तु

पायपीट

विना कारण चालण्याचे श्रम

पिवळा जर्द

पिवळाधमक, अतिशय पिवळा

पिढ्यानपिढ्या

वंशपरंपरागत

पीक पाणी

पीक

पुसतपास

खोल चौकशी

पेच प्रसंग

विपत्ती

पैसा अडका

पैसे, पै पैसा

पोरे बाळे

मुले

प्रसंगावधान

संकट समयी भांबावून न जाणे

फट फजिती

फजिती, अपमानकारक स्थिती

फसवा फसवी

फसवणूक

फंद फितुरी

दगलबाजी, कारस्थान

फाटका तुटका

मोडका तोडका

फाकड पसारा

फापटपसारा, अवास्तव मांडलेला

फाटाफूट

पसारा वेगळे होणे, ताटातूट, विभक्त

फिरवा फिरव

उलटसुलट, उलथविणे, खालीवर करणे

फुकट फाकट

फुकट, मोफत

फेर फटका

इकडे तिकडे फिरणे, भटकणे

फेका फेक

भिरकाविणे

फौज फाटा

सैन्य व त्या बरोबर असणारे लोक, साहित्य इ. फौज, सैन्य

बकध्यान

साधुत्वाचे ढोंग

बरे वाईट

मरण, नाश

बहिणभावंडे

भावंडे, बहीण भाऊ, जवळचे नातेवाईक

ब्रह्मघोटाळा

गोंधळ, आचारविचारांची अव्यवस्था

बनवा बनवी

एकमेकांना बनविणे

बाजारहाट

बाजार खरेदी, बाजारपेठ

बापलेक

वडील व मुलगा किंवा मुलगी

बाग बगीचा

फुलबाग, मळा

बागुलबोवा

भीती वाटण्यासाठी उभे केलेले सोंग

बाजार बुणगे

फौजे बरोबर असणारी अवांतर माणसे

बाड बिछाना

बाड बिस्तरा, सामानसुमान

बाप जन्मी

सर्व आयुष्यात, जन्मापासून आजपर्यंत

बाल्यावस्था

बालपण

बाळी बुगडी

बारीकसारीक दागिने

बारीकसारीक

किरकोळ, बारीक

बाळगोपाळ

लहान मुले

बाळकडू

बाळघुटी, कडू औषधे उगाळून पाजतात ते

बालबोध

सुलभ, सुबोध, लहान मुलांना समजेल असे

बाया बापड्या

बिचार्‍या बायकांचा

बित्तबातमी

नक्की बातमी, बित्तं बातमी

बिनधोक

निश्चित

बिनडोक

विचार न करणारा, मूर्ख

बिनतोड

बिनचूक, सर्वोत्कृष्ट

बीजारोपण

बी पेरणे

बुद्धी पुरःसर

मुद्दाम, जाणून बुजून

बेभरवशी

फसव्या

बेल भंडार

एक प्रकारचा शपथ विधी

बेरीज वजाबाकी

हिशेब

बैल गाडी

बैल जोडलेली गाडी

बोलघेवडा

वाचाळ, वटवट करणारा

बोलाचाली

संभाषण

भरत भेट

राम व भरत यांची भेट

भक्त वत्सल

भक्तावर अती प्रेम करणारा

भरमसाट

पुष्कळ, अमर्याद

भक्तीभाव

भक्तीयुक्त प्रीती, पूज्यतेचा भाव

भले मोठे

खूप मोठे

भलतासलता

कोणीतरी, कोणतातरी

भात भाकरी

जेवण, (भाजी, भाकरी, पोळी इ.)

भाऊ बंदकी

बंधुत्वाची वागणूक

भाकड कथा

बाष्कळ गप्पा, कंटाळवाणी गोष्ट

भांडी कुंडी

सर्व प्रकारची भांडी

भाजी पाला

फळ भाजी व पाले भाजी, कंदमुळे इ.

भाकर तुकडा

भूक भागविण्यासाठी थोडेसे खाणे

भाऊ भाऊ

भावंडे

भांडण तंटा

भांडण, कलह

भीड भाड

संकोच, पर्वा, मुर्वत

भुई सपाट

भुईस लागून, भुपृष्ठ

भूत पिशाच

भुते खेते, मृतांची छाया

भेदाभेद

भेदभाव, परकेपणाची भावना, फरक

भोळाभाबडा

साधा भोळा, भोळासांब

भोसका भोसकी

मारामारी

मनकवडा

दुस-यांचे मन वेधून घेण्याची शक्ती असलेला

मंत्र तंत्र

जादूटोणे, डावपेच

मराठ मोळा

मराठी लोकातील चालीरीती

मरतुकडा

अतिशय अशक्त मनुष्य, रोडका

मनमुराद

आनंददायक, मनसोक्त

मनमिळाऊ

सर्वांशी मिळून मिसळून वागणारा

मनःकामना

अंतःकरणातील इच्छा

मनमोकळा

रखुल्या अंतःकरणाने, संकोच सोडून

मर्कट चेष्टा

माकड चेष्टा, पोरकट चाळे

मागमूस

पत्ता, चाहूल

मान मरातब

आदर सत्कार, बहुमान

म्हातारा कोतारा

म्हातारा, वृद्ध, वयस्क

मातापितर

आईवडील, मातापिता

मारपीट

खूप मारणे, मारहाण

मामा भाचे

नातेवाईक, मामा व भाचा

माया ममता

दया, माया, स्नेह, प्रीती

मायलेकी

आई व मुलगी, माय लेकरे, माय माऊली

मागे पुढे

आगे मागे, केव्हा ना केव्हा

मान अपमान

आदर-अनादर

माल मसाला

सामग्री, उपयुक्त वस्तू

मान पान

आदर सत्कार, मान सन्मान

मीठ भाकर

जेवण, गरिबीचे जेवण

मीठ मिरची

मसाला, चव आणणारे पदार्थ

मुले बाळे

लहान थोर सर्व मुले

मूठमाती

पुरण्याचा अंत्यसंस्कार

मेटाकुटी

महत्प्रयास

मेवा मिठाई

अनेक प्रकारची फळे व मिठाई

मैलोमैल

खूप दूरपर्यंत

मोडतोड

नासधूस

मोडका तोडका

मोडकळीस आलेला

मोल मजूरी

मजुरी घेऊन केलेली लोकांची कामे

यथाशक्ती

आपल्या शक्तीप्रमाणे

यथायोग्य

योग्य दिसेल तसे, अनुरूप, रूढीनुसार

यथाविधी

नियमानुसार

यथासांग

पूर्णपणे, कोणती ही गोष्ट कमी न करता

यथातथा

कसा तरी, कष्टाने, जेमतेम

यश अपयश

मानापमान, स्तुती किंवा निंदा

याता यात

हेलपाटा, त्रास, कष्ट

येर जार

येरझार, खेपा, हेलपाटा

रक्त बंबाळ

रक्ताने माखलेला

रंगढंग

एकंदर देखावा, युक्ती, चाळा

रंग रंगोटी

घर किंवा चेहरा रंगविणे

रत्न जडित

रत्ने बसविलेला

रमत गमत

घाई न करता, विनत्रासाने, सहज

रहाट गाडगे

चांगली व वाईट परिस्थिती, नशीबाचे फेरफार, व्यवहार

रत्ने माणके

मूल्यवान खनिज पदार्थ

रंगबहार

आनंदाची लूट, मौज, सुख

रडत राऊत

रडवा मनुष्य, रडतराव

रडत खडत

मोठ्या कष्टाने, रेंगाळत, नाइलाजाने

रंजलेले गांजलेले

पीडीत, दुःखित

रंगभंग

विरस, आनंदाचा नाश

रदबदल

मध्यस्थी, वाटाघाट

रानी वनी

जंगलात

रान फुले

जंगली फुले

राजा राणी

राजा व राणी, विनोदी जोडपे

राजे महाराजे

सम्राट, राजे व महाराजे

राग लोभ

दुःख व आनंद

राम राज्य

न्यायाचे व प्रजेचे रक्षण करणारे राज्य

राष्ट्रद्रोह

राष्ट्राशी शत्रुत्व

रान पाखरे

रानातील पाखरे

राम रगाडा

गर्दी, पराकाष्ठेची दाटी

राजे रजवाडे

राजे, संस्थानिक, सरदार इ.

राख रांगोळी

नाश, विध्वंस

राग रंग

रागाची लक्षणे

रिकाम टेकटा

निरूद्योगी

रीतभात

रीतीरिवाज

रूपलावण्य

सौंदर्य, बांधेसूदपणा

रूसवा फुगवा

हट्ट, राग आणि चरफड

रोखठोक

उधारीचा नसलेला (रोख), स्पष्ट

रोगराई

लहानमोठे रोग

लघाळ मावशी

गप्पा मारणारी बाई

लपत छपत

चोरून, गुप्तपणे

लहान सहान

बारीक सारीक, हलका

लक्षावधी

लाखो

लग्नकार्य

लग्न समारंभ, मंगल कार्य

लता वेली

वेली

लघळ पघळ

अतिशय बडबड

लंबा-चौडा (चवडा)

लांबलचक

लग्न-बिग्न

लग्न आदि समारंभ

लहान थोर

लहान आणि मोठा

लाकूड फाटा

घर बांधण्यासाठी लागणारे लाकूड विटा इ.

लाजकोंबडा

लाजाळू, भिडस्त

लाजलज्जा

लाज, मर्यादा

लांडा कारभार

नसती लुडबुड, उठाठेव

लांब लचक

प्रशस्त, अवाढव्य

लांडी लबाडी

लहान मोठी लबाडी, फसवणूक

लालन पालन

सांभाळ, संगोपन

लाडी गोडी

लाडकेपणा

लाच लुचपत

लाच, अप्रामाणिकपणाची देवाण घेवाण

लाल भडक

अतिशय तांबडा

लागे बांधे

नातीगोती

लांब सडक

लांब रस्ता

लांडगे-कोल्हे

हिंस्त्र पशु

लुगा सुंगा

बारीक, क्षुद्र, नालायक

लुळापांगळा

कमजोर, व्यंग असलेला

लेचापेचा

अशक्त, कमजोर

लेकरे बाळे

मुले बाळे

लोक-परलोक

इहलोक व परलोक लो

लोट पोट

ळण, बेसुमार, मौज, आनंद

लोणकढी (थाप)

समयानुसार ठेवून दिलेली (थाप), खोटी बातमी

लोणकढे (तूप)

ताजे साजूक (तूप)

वज्रघात

मोठी आपत्ती

वजन माप

प्रमाण

वरण भात

साधे जेवण

वर्ण धर्म

व्यवहार, जातीला योग्य असा आचार

व्रत वैकल्य

व्रताची अपूर्णता, नेम, व्रते

वर रवाल

उंचसखल, विषम रीतीने

वर्णहीन

जातीहीन

वर्ण क्रम

अक्षरांचा क्रम

वृक्षवाटिका

बाग, उपवन

व्यथा वेदना

दुःख, वेदना

वटहुकुम

ताबडतोब अमलात येणा-या कायद्याचे फर्मान

वडील धारा

घराण्यात शिस्त राखण्याचा अधिकार असलेली व्यक्ती

वरचष्मा

वरचढपणा, वर्चस्व

वरदहस्त

मोठ्यांचा आशीर्वाद, वर देण्यासाठी उचललेला हात

वरदक्षिणा

वधूचा पिता वरास देतो ती रक्कम

वहिवाट

चाल, रीत, व्यवस्था

वाडवडील

पूर्वज, वडील माणसे

वास्तपूस्त

विचारपूस

वाईटसाईट

निरुपयोगी, निरर्थक

व्यापार उदीम

व्यवहार, कामधंदा

वादळ वारे

तुफान

वाकडा तिकडा

वक्र

वाटा घाटी

चर्चा, वादविवाद, वाटाघाट

वाक् बगार

कुशल, पटाईत

वाचाळ पंचविशी

 बडबड लावणे

वाणसौदा

वाणसवदा, किराणा माल

वाजत गाजत

धुम धडाक्यात

वाजागाजा

प्रसिद्धी, गवगवा

वाटचाल

प्रवास

वादविवाद

चर्चा

वारे माप

प्रमाणाबाहेर, विसंगत

विघ्नसंतोषी

दुस-यांच्या कामात विघ्न आलेले पाहून संतोष मानणारा

विचारपूस

वास्तपुस्त, चौकशी

विधिघटना

नशीब, प्रारब्ध, कर्मगती

वितंडवाद

अट्टाहासाने खोटा पक्ष स्थापन करण्यासाठी वादविवाद

विनासायास

श्रमाशिवाय

विरहव्यथा

विरहामुळे, होणारे दुःख

विल्हेवाट

उधळपट्टी, व्यवस्था, योग्य योजना

विश्वासघात

विश्वास दाखवून फसवणूक, बेइमानी

विस्मय चकित

आश्चर्यचकित

वेडा वाकडा

वाकडातिकडा

व्यासपीठ

उच्चासन, पुराणिकांचे आसन

शत पावली

जेवाणानंतरच्या फे-या

शरीर प्रकृती

शरीराची ठेवण, स्वभाव

शंखशिंपले

समुद्रात राहणा-या काही प्राण्यांची घरे

शतमूर्ख

अत्यंत मूर्ख

शहाणा सुरता

बुद्धीमान, हुषार व देखणा

शरीर यष्टी

शरीर ठेवण, अंगकाठी

शब्द पाल्हाळ

शब्दावडंबर, शब्दजाल

शर पंजर

बाणांचा पिंजरा, पलंग

श्रम जीवी

मेहनती

श्रमदान

समाजासाठी विनामूल्य कष्टाचे काम करणे

शिळापाका

उरलेसुरलेले जेवण

शिकला सवरलेला

शिक्षण घेतलेला, शिक्षित

शिवण टिपण

शिवणकाम

शिरोमणी

मुकुटमणी, श्रेष्ठ इसम

शिपाईप्यादे

जासूद, सैनिक

शीघ्रकोपी

रागीट, तापट

शेजारपाजार

शेजार

शेठसावकार

सावकार, व्यापारी

शेंडेफळ

अखेरचे मूल

शेती भाती

शेतीवाडी, शेती, शेत जमीन

शेला पागोटे

बहुमानाची वस्त्रे

शेणसडा

पाण्यात शेण घालून जमिनीवर शिंपडणे

शेळ्या मेंढ्या

पाळीव जनावरे, बुधिबळातील एक डाव

शे दोनशे

शंभर-दोनशे

षोडशोपचार

विधीपूर्वक केलेले काम, पूजेचा विधी

सकट निकट

एकूण सगळे

संगतीसोबती

स्नेही, दोस्त, संगतसोबत

सगा सोयरा

नातेवाईक, सगेसोबती, सगे संबंधी, सोयरा धायरा

सडपाताळ

किरकोळ अंगाचा, रोडका

सणवार

सणबीण

सदलाबदल

अदलाबदल

समज उमज

पूर्ण जाणीव, ज्ञान

सर मिसळ

मिश्रण, एकत्रीकरण

स्वयंपाक पाणी

जेवण

सटरफटर

किरकोळ

सदा सर्वदा

नेहमी, सतत

सरळसोट

सरळ

सणसुदी

सणाचा दिवस

सडा सारवण

झाडलोट

समुद्रमंथन

समुद्र घुसळणे

वादविवाद

वाटाघाट

सल्यापसल्य

चांगले वाईट

समुद्रमेस्वला

पृथ्वी

सवतासुभा

स्वतःचे असे निराळे

सती सावित्री

पतिव्रता, साध्वी

सटी सामासी

क्वचित प्रसंगी, कधीतरी

सत्ययुग

चार युगातील पहिले युग, सुवर्णयुग

सत्वनिष्ठ

सत्व न सोडणारा

सल्लामसलत

विचार विनिमय, हितवाद

सरसकट

सरासरी, एकत्रितपणे

सत्य-असत्य

खरेखोटे

सर्वसामान्य

सर्वास लागू होणारा

सावरभात

साखर व केशर घालून केलेला भात

साद पडसाद

प्रतिध्वनी

साधाभोळा

सरळ, स्वभावाने गरीब

सागरतीर

समुद्रतीर, समुद्र किनारा

सांड लवंड

सांडासांड, सोडणे, पालथे करणे

साडी चोळी

स्त्रियांचा पोषाख

साज-शृंगर

थाटमाट, सजणे, नटणे

साखर झोप

अरुणोदयाच्या वेळची झोप

साधा सिधा

सरळ, एकमार्गी, निष्कपट

सांज सकाळ

नेहमी

सामान सुमान

चीज वस्तू, सामग्री, साहित्य

स्नान संध्या

स्नान व संध्या, देवपूजा

सांग सुगरण

नुसती तोंड पाटील की करणारी

सांगा वांगी, सांगोवांगी

ऐकीव गोष्ट

साधक बाधक

अनुकूल व प्रतिकूल, योग्य अयोग्य

सासुरवाडी

पत्नीचे माहेर

साळीमाळी

समाजातील काही वर्ग

साफसफाई

स्वच्छता, साफसुफी

साधुसंत

साधू आणि संत

स्त्री-पुरुष

पतीपत्नी, पुरुष व स्त्रिया

सुख-सोहळा

आनंददायक प्रसंग

सुईदोरा

सुई आणि दोरा

सुकाळसौदा

अत्यंक स्वस्त मालाची देवघेव

सुरंगाठ

सहज सुटण्यासारखी गाठ

सुतराम

जरासुद्धा (नाही)

सुदामपोहे

गरीब माणसाची भेट

सुतोवाच

सुचविणे, सांगण्यास किंवा बोलण्यास सुरवात करणे

सेवासुश्रूषा

आजारी माणसाची काळजी घेणे

सोनेनाणे

सोने व इतर किमती वस्तू

सोक्षमोक्ष

गुंतून पडलेल्या व्यवहाराचा काही तरी कायमचाशेवट करणे, मोकळीक

सोयरे सूतक

लागे बांधे

सोवळे ओवळे

शुद्धतेने राहण्यासाठी सोवळेपणाची स्थिती

हरीवदन

हरीचे नामस्मरण

हरिचंदन

केशर, पिवळा चंदन

हसवाहसवी

हास्य

हलकी सलकी

कमी दज्र्याची, कमी प्रतीची

हवा पाणी

वातावरण

हळदीकुंकू

सौभाग्यदर्शक, हळद कुंकू

हसतखेळत

मजेत, हासत बागडत

हरि पाठ

विठ्ठल भक्तीपर अभंग

हवा पालट

हवेत बदल

हमरीतुमरी

हंबरातुंबरी, जोराचे भांडण, हमरातुमरी

हकनाक

हकनाहक, विनाकारण

हर हुन्नर

प्रत्येक कौशल्य, कसब

हाड वैर

अत्यंत तीव्र व फार जुने वैर

हात घाई

अती घाई

हातचलाखी

हस्त चापल्य, नजरबंदीचा कारभार

हातानिराळा

हातावेगळे, घेतलेले काम संपविणे

हाल अपेष्टा

नाना प्रकारची संकटे, आपत्ती

हाव भाव

भावनादर्शक अभिनय

हृदय शून्य

निर्दय, क्रूर

हाल हवाल

हकीकत, वर्तमान, हालअपेष्टा

हाडी मासी

शरीराने, अंगकाठी, शरीर रचना

हास्य विनोद

थट्टा मस्करी

हिरवा-निळा

रंगाची छटा

हिरवा गार

गडद हिरवा

हिरवा पिवळा

रंगाची छटा

हेकेखोर

हट्टी, दुराग्रही

हेवेस्वोर

व्देशी, मत्सरी

हेवादावा(हेवादेवा)

शत्रुभाव, व्देश, मत्सर

हैबती गैबती

अजागळ

हैदोसदुल्ला

 हैदोस, गोंधळ

होमहवत

होम, यज्ञ

हौसमौज

चैन, इच्छा

क्षमा याचना

क्षमेची भिक्षा मागणे

क्षणोक्षणी

पावलो पावली, प्रत्येक क्षणास

क्षीरसागर

दुधाचा समुद्र

क्षेम कुशल

कुशल क्षेम समाचार

ज्ञान विज्ञान

शास्त्रीय ज्ञान

ज्ञानदीप

बुद्धीरूपी दिवा

ज्ञान कोश

ज्ञानाचा कोश (संग्रह)

ज्ञान अज्ञान

ज्ञान आणि अज्ञान

ज्ञान साधना

ज्ञान संपादन करणे


"मराठी जोडशब्द व त्यांचे अर्थ : Marathi jodshabd v art"

 श्री राम गोवर्धन डोळे