महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC, HSC result date 2023
दोन वर्षाच्या कोरोना नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाने पूर्वीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेण्यात आलेले आहेत .
परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तर पत्रिकांची तपासणी केली आहे ,सर्व उत्तर पत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरू झाली आहे, बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक 90% पर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.
'महाराष्ट्र बोर्ड दहावी- बारावी निकाल तारीख 2023 : Maharashtra SSC, HSC result date 2023'
वेळेत निकाल लावल्यास पुढील प्रवेशाला विलंब होणार नाही ,याची खबरदारी एच. एस .सी आणि एस .एस .सी बोर्ड कडून घेतली जात आहे, त्यानुसार निकाल वेळेत लागावेत असे नियोजनही बोर्डाने केले आहे.
बारावीचा निकाल मे अखेरीस जाहीर न झाल्यास 3 ते 4 जून पर्यंत तो निकाल लागेल ,असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
त्यानंतर 6 ते 8 दिवसात म्हणजेच 10 जून पर्यंत दहावीचा निकाल लागावा अशीही तयारी बोर्डाने केली आहे.
# प्रवेश प्रक्रिया #
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे .त्यामुळे बारावी नंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे .त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे ,साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांची नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता बोर्ड घेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा