विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करीत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये पुढील प्रमाणे नोंदी असाव्यात.
विद्यार्थी प्रगती पत्रक नोंदी |
विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रावरील नोंदी यामध्ये आपण विशेष प्रगती नोंदी ,आवड /छंद नोंदी ,सुधारणा आवश्यक नोंदी ,व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी यादी पुढीलप्रमाणे:
प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole
विशेष प्रगती नोंदी :
* दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.
* दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो.
* दररोज शाळेत उपस्थित राहतो.
* परिपाठात सक्रिय सहभाग घेतो.
* गटकार्यात उत्कृष्ट सहभाग घेतो.
* संगणकावर छान चित्र काढतो.
* मोबाईलचा योग्य वापर करतो.
* मोठ्यांचा आदर करतो.
* शालेय शिस्त आत्मसात करतो.
* इंग्रजी वाक्य बोलतो.
* पाढे पाठांतर करतो.
* प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
* मजकुराचे वाचन समजपूर्वक
करतो.
* आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
* दिलेल्या विषयावर
मुद्देसूद बोलतो.
* लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन
करतो.
* योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
* विविध विषयावरील चर्चेत
भाग घेतो.
* स्वत:हून प्रश्न विचारतो.
* विविध बोलीभाषेतील नवीन
शब्द समजून घेतो.
* बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
* व्याकरणानुसार भाषेचा
वापर करतो.
* भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
* बोधकथा,वर्तमानपत्रे,मासिके इ वाचतो माहिती
सांगतो.
* ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष
काढतो.
* गोष्टी,कविता,लेख वर्णन इ.स्वरूपाने लेखन करतो.
* मुद्देसूद लेखन करतो.
* शुद्धलेखन अचूक करतो.
* अचूक अनुलेखन करतो.
* स्वाध्याय अचूक सोडवितो.
* नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
* भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
* लेखनाचे नियम पाळतो.
* लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
* वाक्यप्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
* दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो.
* पाठातील शंका विचारतो.
* हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
* गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
* वाचनाची आवड आहे.
* कविता चालीमध्ये म्हणतो.
* शिक्षका विषयी आदर बाळगतो.
* स्वाध्याय पुस्तिका स्वतः पूर्ण करतो.
* शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
* प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.
* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.
* म्हणींचा योग्य ठिकाणी वापर करतो.
* दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.
* गणितातील क्रिया अचूक करतो.
* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.
* इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो.
* चित्राचे वर्णन करतो.
* सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
* कार्यानुभव मधील वस्तू सुबक तयार करतो.
* तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग करतो.
* नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.
* विविध वाद्य सुंदर वाजवतो.
* वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.
* कागदापासून विविध आकार तयार करतो.
* रांगोळी सुंदर काढते.
प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole
आवड छंद:
* अवांतर वाचन करणे.
* क्रिकेट खेळणे
* सायकल चालवणे
* चित्र काढणे.
* कागदी वस्तू बनवणे
* पर्यावरण रक्षण करणे
* वस्तूंची निगा राखणे
* स्वच्छता करणे
* मित्रांना भेटणे
* युट्युब वरून माहिती काढणे
*टीव्ही पाहणे
* बातमी पाहणे
* खोखो खेळणे
* कबड्डी खेळणे
* संगणक हाताळणे
* पोहणे
* गोष्ट ऐकणे
* गीत गायन करणे
* नृत्य करणे
* लेखन करणे
* संग्रह करणे
'प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole '
* व्यायाम करणे
* गेम खेळणे
* प्रतिकृती बनवणे
* नाण्यांचा संग्रह करणे
* गोष्टींचा संग्रह करणे
* सुविचार वाचणे
* वर्तमानपत्र वाचणे
* संगीत ऐकणे
* गाणी म्हणणे
* संगणकावर काम करणे
* प्रयोग करणे
* कविता गायन करणे
* उपक्रम करणे
* बडबड गीतांचा संग्रह करणे
*इतरांना मदत करणे
* शुद्धलेखन लिहिणे
* नक्षीकाम करणे
* गटचर्चा करणे
* प्रार्थनांचा संग्रह करणे
* सूत्रांचा संग्रह करणे
* गणिती नियम पाठ करणे
* पाढे पाठ करणे
* इतरांची मुलाखत घेणे
* बातमी सांगणे
* गप्पा मारणे
* सुविचार संग्रह करणे
* वर्तमानपत्रातील कात्रणे संग्रह करणे
* खेळाडू चित्रसंग्रह करणे
* शास्त्रज्ञ चित्र संग्रह करणे
* स्पर्धा परीक्षा अभ्यास करणे
* प्रवास करणे
* विविध ठिकाणाची माहिती घेणे
* बैलगाडी चालवणे
* प्राण्यांची काळजी घेणे
आवश्यक सुधारणा :
* अभ्यासात सातत्य असावे.
*स्पष्ट वाचन करावे.
* अवांतर वाचन करावे.
* अक्षर वळणदार काढावे.
* इंग्रजी शब्द संग्रह वाढविणे.
* जोडाक्षरे वाचन करणे.
* इंग्रजी वाचन सुधारणे.
* इंग्रजी शब्द पाठ करणे.
* नियमित अभ्यास करावा.
* नियमित शाळेत यावे.
* गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
* गणितातील सूत्रे पाठ करावे.
* गणिती क्रिया सराव करावा.
* खेळात सहभागी व्हावे.
* गणित पाढे पाठ करावे.
* म्हणी पाठांतर करावेत.
* वाक्प्रचार पाठ करावे.
* सुविचार पाठ करावे.
* गणिताचा व्यवहार ज्ञानात उपयोग करावा.
* इंग्रजी बोलणे सराव करावा.
* हिंदी बोलणे सराव करावा.
* हिंदी भाषेचा उपयोग करावा.
* संवाद कौशल्य वाढवावे.
* शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
* शुद्धलेखनामध्ये प्रगती करावी.
* वर्तमानपत्राची नियमित वाचन करावे.
* लेखनातील चुका टाळाव्यात.
* स्वाध्याय पुस्तिका पूर्ण कराव्यात.
* विज्ञानाचे प्रयोग करून पाहावे.
* प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.
* गटकार्यात सहभाग वाढवावा.
* उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
* संख्यांचे वाचन सराव करावा.
* नकाशा वाचन सराव करावा.
* परिपाठात सहभाग घ्यावा.
* भाषा विषयात प्रगती करावी.
* चित्रकलेचा छंद झोप असावा.
* त्याले उपक्रमात सहभाग घ्यावा.
* प्रश्नोत्तरे पाठ करावीत.
* कविता पाठ कराव्यात.
* संवाद कौशल्य वाढवावे.
व्यक्तिमत्व गुणविशेष:
* इतरांना मदत करतो.
* भेदभाव न करता सर्वांमध्ये मिसळतो.
* निस्वार्थपणे काम करतो.
* परिसर स्वच्छ ठेवतो.
* वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.
* शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
* मोठ्यांचा आदर करतो.
* आपली मते ठामपणे मांडतो.
* मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.
* गृहपाठ आवडीने करतो.
* गटात काम करताना इतरांची मते जाणून घेतो.
* शाळेत येणे आनंद वाटतो.
* नवीन नवीन गोष्टी शिकून घेतो.
* कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
* आत्मविश्वासाने काम करतो.
* शाळेच्या नियमांचे पालन करतो.
* कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.
* प्रश्न विचारताना घाबरत नाही.
* धाडसी वृत्ती दिसून येते.
* उपक्रमामध्ये कृतिशील सहभाग घेतो.
* इतरांपेक्षा वेगळा कल्पना/ विचार मांडतो.
* इतरांशी नम्रपणे वागतो.
* स्वतःची चूक मान्य करतो.
"प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole "
श्री राम गोवर्धन डोळे
शिक्षक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा