राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.

सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की 4% महागाई भत्त्याचा शासन निर्णय आला आहे.

   आज 30 जून 2023 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय आला आहे..

     राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

    शासन असे आदेश देत आहे की,1 जानेवारी 2023 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 38 टक्क्यावरून 42 टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतना सोबत रोखीने देण्यात यावी.

'राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.'

       महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे लागू राहील.

     यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखाक्षर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

     सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202306301832142205असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
  "राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत".



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा