जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.
महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय ,अधिसूचना, परिपत्रक इत्यादी द्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता नमूद केलेली आहे.
सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक 3 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे )दोन वर्षे इतकी शितलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 25 वर्षे )विचारात घेण्यात यावी.
तसेच विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदासाठी देखील दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत विहित कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतके शिथिलता देय राहील.
त्याचबरोबर ग्राम विकास विभाग , शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 नुसार मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेले /भरलेले आहेत, अशा उमेदवारांचे वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेत बसण्याचा अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये.
'जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.'
पुढील GR पहा:
राज्य शासनाच्या 43 विभागाअंतर्गत तब्बल पावणेतीन लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यात 75 हजार पदांची मेगा भरती केली जाणार आहे .भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आराखडा शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे.
जिल्हा परिषदेतील गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय जीआर जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे.
1) आरोग्य पर्यवेक्षक
2) आरोग्य सेवक (पुरुष)
3) आरोग्य सेवक (महिला)
4) औषध निर्माण अधिकारी
5)कंत्राटी ग्रामसेवक
6)कनिष्ठ अभियंता
7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी )
8) कनिष्ठ अभियंता( विद्युत )
9) कनिष्ठ आरेखक
10) कनिष्ठ लेखा अधिकारी
11) माध्यम कनिष्ठ यांत्रिकी
12) कनिष्ठ लेखाधिकारी
13) कनिष्ठ सहाय्यक लिपीक
14) कनिष्ठ सहाय्यक लेखा
15) जोडारी
16) तारतंत्री
17) पर्यवेक्षिका
18) पशुधन पर्यवेक्षक
19) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
20) यांत्रिकी
21) रिगमन
22) लघुटंकलेखक
23) लघुलेखक (उच्च श्रेणी)
24) लघुलेखक (निम्न श्रेणी)
25) वरिष्ठ सहाय्यक लिपिक
26) माध्यम विस्ताराधिकारी (कृषी)
27) लघुलेखक उच्च श्रेणी
28) वरिष्ठ सहाय्यक लेखा
29) विस्तार अधिकारी( पंचायत )
30) विस्ताराधिकारी (शिक्षण)
31) विस्ताराधिकारी (सांख्यिकी)
वरील पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे ,अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा. त्यामध्ये सर्व अभ्यासक्रमम सविस्तरपणे दिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा