संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून करण्याबाबत... शासन निर्णय
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.....
संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून करण्याबाबत.. |
शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2023...
प्रस्तावना: बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी /अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्रमांक 2 येथील दि. 28 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये "असाधारण रजा "म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी " असाधारण रजा "ऐवजी "अर्जीत रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी /अधिकारी सहभागी झाले होते ,त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोद्धारण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202304131612516907असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अ. म. चेमटे
अवर सचिव ,महाराष्ट्र शासन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा