सुट्टीत पालकांनी मुलांसाठी करावयाच्या गोष्टी :
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी आणि पालक यांचा जास्त संपर्क येत नाही या साठी सुट्टीत पालकांनी मुलांसाठी करावयाच्या गोष्टी ..
![]() |
सुट्टीत पालकांनी मुलांसाठी करावयाच्या गोष्टी |
आजच्या काळात सुट्टीत मुलांना व्यस्त आणि सक्रिय ठेवणे खूप आव्हानात्मक बनले आहे. यासाठी पालकांनी पुढील कामे करावी.
1) आपल्या पाल्यासोबत रोज सकाळ संध्याकाळचे जेवण करा. जेवण केल्यानंतर अन्न वाया जाऊ देऊ नका त्यांचे ताट त्यांना धुऊ द्या.
2) विद्यार्थ्यांना घरी भाजी निवडणे ,कपडे धुणे ,झाडून काढणे अशी कामे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.
3) आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी मुलांना सोबत घेऊन जा .आपण किती कष्ट करतो ?कोणते काम करतो ?कसे काम करतो ?हे मुलांना कळू द्या त्याची माहिती मुलांना द्या, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपले वडील आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत.
4) विद्यार्थ्यांना घरी त्यांच्या आजी- आजोबा सोबत गप्पा मारण्याची संधी द्या, त्यांच्यासोबत मुलांचे फोटो काढा.
5) आपल्या शेजारी जे कुटुंब राहत आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी जवळीक वाढविण्याची संधी द्या तसेच मित्रांच्या मुलांना घरी बोलवा. 'सुट्टीत पालकांनी मुलांसाठी करावयाच्या गोष्टी '
5) आपल्या शेजारी किंवा जवळच्या गावी भरणाऱ्या स्थानिक यात्रा, बाजार अशा ठिकाणी मुलांना सोबत घेऊन जा.
6) आपण स्वतः मोबाईलचा वापर कमी करा, कारण आपलेच अनुकरण आपले मुलं करत असतात.
7) आपल्या लहानपणीच्या आठवणी तसेच आपल्या पूर्वजांची माहिती आपल्या मुलांना सांगा.
8) मुलांना सुट्टीत किमान एक तरी अवांतर वाचन पुस्तक वाचण्यासाठी विकत घेऊन द्या.
9) मुलांचे सर्व हट्ट पुरविणे म्हणजे आपण चांगले पालक ही कल्पना डोक्यातून काढून टाका, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करू नका त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या.
10) सुट्टीत मुलांना खेळू द्या ,पडू द्या तसेच कपडे खराब होऊ द्या.
11) मुलांना स्वतः व्यक्त होऊ द्या त्यांना त्यांची स्वतःची मते मांडू द्या.
12) मुलांसोबत तुम्हीही तुमचा आनंद व्यक्त करा.
13) सुट्टीत मुलांना पोहणे शिका मैदानी खेळ शिकवा.
13) मुलांना रोज इयत्तानुसार एक ते तीन तास अभ्यासासाठी बसवा.
14) मुलांना स्वयंपाक बनवायला शिकवा त्यांचे आवडीचे पदार्थ त्यांना बनवायला सांगा.
15) आपल्या मुलांना पर्यावरणाची काळजी घ्यायला शिकवा.
16) सुट्टीत मुलांना नवीन काहीतरी शोधवृत्तीची सवय लावा.
17) मुलांना जबाबदारीची सवयी विकसित करा. उदा. त्यांची खोली त्यांना स्वतःला स्वच्छ करायला सांगा.
18) पालकांनी मुलांसोबत नवीन कौशल्य विकसित करावी.
19) त्यांची कपडे त्यांना धुवायला सांगा आणि सुकायला टाकायला सांगा. म्हणजेच विद्यार्थी स्वावलंबी होतील.
20) शिक्षक आणि तुम्ही पालक मिळून आपण सर्वजण उद्याचे भावी नागरिक, सुजाण नागरिक घडवूया.
चला तर मग आपण सर्व मिळून उद्याचे भाविक नागरिक घडवूया.
"सुट्टीत पालकांनी मुलांसाठी करावयाच्या गोष्टी "
श्री राम गोवर्धन डोळे
शिक्षक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा