शिक्षक भरती बाबत..


शिक्षक भरती बाबत..

  संच मान्यतेची लगबग सुरू, जुलैपासून शिक्षक भरतीला सुरुवात....
शिक्षक भरती बाबत..

शिक्षक भरती बाबत...


राज्यातील शालेय शिक्षकांची संच मान्यता आता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील माहिती जुळत नसल्याने ही संचमान्यता रखडली होती.

                विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम शाळा स्तरावर सुरू आहे .ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे .शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहाय वितरण 20 मे पर्यंत केले जाणार आहे, त्यानंतर शाळांना 30 जून पर्यंत बिंदू नामावली निश्चित करावी लागणार आहे.

      'शिक्षक भरती बाबत'..

अशी असेल प्रक्रिया : 

* विद्यार्थ्यांचे आधार जोडणीचे काम शाळा स्तरावर सुरू.

* कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार.

* शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहाय वितरण 20 मे पर्यंत होणार.

* शाळांना 30 जून पर्यंत बिंदू नामावली निश्चित करावे लागणार.

* शाळा व्यवस्थापनांना पहिल्या तिमाहीसाठी शिक्षक भरतीच्या पोर्टलवर 15 जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागणार.

* त्यानंतर रिक्त पदासाठी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, तसेच नियुक्तीसाठी शिफारस करणे आदी प्रक्रिया 20 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी लागणार. 

        असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

          

             "शिक्षक भरती बाबत"..

श्री राम गोवर्धन डोळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा