नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे - National Education Policy 2020

 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांनी केली आहे.

      केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे .तब्बल 34 वर्षानंतर देशात शैक्षणिक धोरण लागू होणार आहे .महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. चला तर पाहूया नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत कोणते -कोणते बदल करण्यात आले आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 

भारतात आजपर्यंत एकूण चार शैक्षणिक धोरण आहेत. पहिले शैक्षणिक धोरण 1968 मध्ये ,दुसरे 1986 मध्ये तयार करण्यात आले आहे ,तिसरे शैक्षणिक धोरण 1992  मध्ये करण्यात आले आणि आता चौथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. नवीन शिक्षण धोरण तब्बल 34 वर्षानंतर बदलले आहे.

* शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे आणि भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

* नवीन शैक्षणिक धोरण हे पाच स्तंभावर लक्ष केंद्रित करते : प्रवेश, , समानता ,गुणवत्ता, परवडणारी आणि जबाबदारी.

नवीन शिक्षण धोरणाची(NEP )ठळक वैशिष्ट्ये : 

नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट भारतातील सर्व मुलांना दर्जेदार आणि न्याय्य शिक्षण देण्याचे आहे. धोरणातील काही प्रमुख ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत...

3 ते 14 वर्षे वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट 6 ते 14 वर्षे होता.

* बोर्ड फक्त बारावीच्या वर्गाला असेल.

* महाविद्यालयीन पदवी चार वर्षाची असेल.

* दहावी मंडळ रद्द

* एम फिल बंद असेल.

* नववी ते बारावीच्या सत्र परीक्षा असतील.( semester Exam)

* शालेय शिक्षण 5+3+3+4 या सूत्राच्या अंतर्गत शिकवले जाईल. यापूर्वी 10+2 असे सूत्र होते.

* इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश.

* पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न.

* विद्यार्थ्यांचं ते स्वतः, सह विद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार.

* पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न करता विषय निवडण्याची मुभा.

* सरकारी आणि खाजगी शाळा मधील शिक्षणात समानता.

चला तर पाहूया नवीन शिक्षण धोरणाचे सूत्र 5+3+3+4म्हणजे काय?

* 5 वर्षे मूलभूत (Fundamental)

1) नर्सरी - 4 वर्षे

2) ज्युनिअर केजी- 5 वर्षे

3) सिनियर केजी -6 वर्षे

4) इयत्ता पहिली- 7 वर्षे

5) इयत्ता दुसरी- 8वर्षे

* 3 वर्षाची प्रारंभिक शाळा

1) इयत्ता तिसरी- 9 वर्षे

2) इयत्ता चौथी- 10 वर्षे

3) इयत्ता पाचवी- 11 वर्षे

* 3 वर्षांची माध्यमिक शाळा

1) इयत्ता सहावी- 12 वर्षे

2) इयत्ता सातवी- 13 वर्षे

3) इयत्ता आठवी- 14 वर्षे

* 4 वर्षे माध्यमिक शाळा

1) इयत्ता नववी- 15 वर्षे

2) इयत्ता दहावी- 16 वर्षे

3) इयत्ता अकरावी- 17 वर्षे

4) इयत्ता बारावी- 18 वर्षे                                                      #

'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे'

या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सूत्राची माहिती पुढील प्रमाणे-

# पायाभूत टप्पा ( 5 वर्षे)

या टप्प्यात मुलाच्या शिक्षणाची पहिली पाच वर्षे समाविष्ट असतील. शिक्षणाच्या पहिल्या तीन वर्षात मुलांना जवळील अंगणवाडी ,बाल वाटिका किंवा समुदायावर आधारित नर्सरीमध्ये शिकवले जाईल. शाळेच्या इतर दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्याला विविध स्तरावर खेळ आधारित क्रिया ,कला आधारित शिक्षणाद्वारे मूलभूत कौशल्य आणि ज्ञान शिकविले जाईल.

# तयारीचा टप्पा (3 वर्षे )

या टप्प्यामध्ये 8 ते 11 वयोगटातील विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्य विकसित करण्यासह मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल .पूर्वतयारीचा टप्पा विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील संकल्पना समजून घेण्यास मदत करेल.

# मध्यम अवस्था (3वर्षे)

या टप्प्यामध्ये 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांना वाचन ,लेखन ,मूलभूत भाषा कौशल्ये यासारखी मूलभूत शैक्षणिक कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.त्यांच्याकडून टीमवर्क, समस्या सोडवणे ,विचार करणे यासारखे जीवन कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.

# माध्यमिक टप्पा ( 4वर्षे)

या टप्प्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थी असतील या टप्प्यात त्यांना इंग्रजी ,गणित ,विज्ञान आणि सामाजिक अभ्यास यांचा समावेश असलेला मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना भाषा , कला ,  व्यावसायिक विषयासह विविध निवडकांमधून निवड करण्याची संधी असेल.

महत्वाचे मुद्दे : 

* आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांची मातृभाषा, त्यांची स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकवली जाईल. इतर विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकवला जाईल.

* आता दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक नाही आता फक्त बोर्ड परीक्षा बारावी मध्ये द्यावी लागेल.

* महाविद्यालयीन पदवी आता तीन व चार वर्षाची असेल म्हणजेच, पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र (certificate)मिळेल, दुसऱ्या वर्षी पदविका असेल आणि तिसऱ्या वर्षी डिग्री मिळेल.

* केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.

* या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, अनेक संस्था स्थापन केल्या जातील जेणेकरून हे धोरण सुरळीत चालेल.

* नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अभ्यासक्रम मध्यभागी सोडून ,दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल ,तर तो पहिला अभ्यासक्रमातून ठराविक काळासाठी ब्रेक घेऊन दुसऱ्या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतो.

* नवीन राष्ट्रीय धोरणाचे उद्दिष्ट शिक्षणावर भर देऊन पाठ्यपुस्तकावरचे अवलंबित्व कमी करण्याचे आहे.

या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण तसेच व्यावसायिक कौशल्याचा विकास होऊन तो शासनाला नोकरी मागणारा नाही , तर इतरांना नोकरी देणारं होईल व पुढील भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या दृष्टीचा विकास होईल असे या धोरणावरून मला वाटते.

या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू तसेच देशाची वाटचाल उज्वल भवितव्याकडे होणार हे निश्चित.

" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे"

श्री राम गोवर्धन डोळे 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा