नवोदय परीक्षेला जाताना.....

 

    नवोदय परीक्षेला जाताना.....

"नवोदय परीक्षेला जाताना".....
"नवोदय परीक्षेला जाताना".....
नवोदय परीक्षेला जाताना आपण काय काय सोबत घ्यावे , पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी ते आज आपण पाहणार आहोत..

घरून लवकर निघा ,सावकाश जा ,वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचा.

* साडेदहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचा.

* नवोदय परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट दोन प्रतित सोबत घेऊन जा.

* परीक्षेला जाताना उत्तर पृष्ठावर लिहिण्याकरता केवळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचाच वापर करा, त्यासाठी तीन पेन सोबत घेऊन जा.

* परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करण्यास सक्त मनाई असते.

* सोबत एक पॅड घेऊन जा.

* तुमच्यासोबत एक हात रुमाल घेऊन जा, कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो, तो घाम साफ करण्यासाठी.

* पाण्याची एक बॉटल सोबत घेऊन जा.

* कच्चे काम प्रश्नपत्रिका वर करा, कच्च्या कामासाठी जी जागा आहे त्यावरच करा. 

* पेपर सोडविताना तुम्हाला पूर्ण दोन तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडू नका वेळेचे नियोजन करा.

* तुम्हाला प्रत्येक खंडात स्वतंत्रपणे क्वालिफाय व्हावे लागेल, त्यासाठी प्रत्येक खंडाची उत्तरे द्यावी लागतील.

             'नवोदय परीक्षेला जाताना'.....

* पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा.

* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न सोडवताना सूचना काळजीपूर्वक वाचा.

* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न दहा प्रकार तुम्हाला येतात, पण अति आत्मविश्वास करू नका, प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा गडबडीत उत्तरे निवडू नका.

* चाळीस आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे टार्गेट ठेवा.

* अंकगणित वरील प्रश्न सोडविताना प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर अंदाजे करू नका ,कितीही सोपा प्रश्न असला तरी तो सोडवाच.

*कधी कधी सुरुवातीला पाच ते सहा प्रश्न खूपच सोपे येतात आणि मग आपण रिलॅक्स होतो, उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच आपण खऱ्या चुका करतो हे लक्षात ठेवा.

* नवोदयचे खरे मेरिट हे गणितावरच आधारित असते ,त्यामुळे गणितावर जास्त फोकस करा.

* महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा, जिल्ह्यात जवळपास आठ ते नऊ हजार विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसतात आणि त्यातील फक्त 80 विद्यार्थी नवोदय परीक्षेला सिलेक्ट होतात.

* भाषा परीक्षण म्हणजेच उताऱ्यावरील प्रश्न सोडविणे अगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या, त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरुवात करा ,उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उत्तराशी जुळणारे आहे का याची खात्री करा.

* उतारावरील वीस ची वीस प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने टार्गेट ठेवा.

* शेवटी एकच सांगतो तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80  प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या सर्वोच्च शिखरावर व्यवस्थित गुंफण करा, आणि नवोदयचे तुमचे स्थान निश्चित करा. यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 💐

"नवोदय परीक्षेला जाताना".....

     परीक्षेला जाता जाता पुढील लिंक वर क्लिक करून नवोदय संदर्भाचे सर्व व्हिडिओ पहा...  https://www.youtube.com/@ramgovardhandole8936

     श्री राम गोवर्धन डोळे





Things parents should do for kids on vacation.

 Things parents should do for kids on vacation.

In today's technological age ,things parents should do for their kids during vacations to avoid too much contact between students and parents.

Things parents should do for kids on vacation.
Things parents should do for kids on vacation.

Keeping kids engaged and active during the holidays these days has become quite a challenge for parents to do the following.

1) Eat breakfast and dinner with your child . Don't  late the food go to waste after the meal ,let them wash their plate.

2) Encourage students to do chores like picking vegetables, washing clothes ,sweeping at home.

3) Take children with you to the place where you are working. How hard do you work? What work do you do ? How does it work ? Let the children know this ,give the information to the children, that means they will realize how much their father is working for us.

4) Give students an opportunity to chat with their grandparents at home. Take pictures of the children with them.

5) Go to the families who live in your neighbourhood and give them and opportunity to grow closer . Also invite your friends children to their home.

6) Take children along to local festival,bazaars in your neighbourhood or nearby villages. inform them about it.

           'Things parents should do for kids on vacation'.

7) You yourself should reduce the use of mobile phones because you are children are immidating you.

8) Tell your children about your childhood memories and about your ancestors.

9) Buy kids at least one extra reading book to read during vacation.

10) Get rid  of the idea that you are a good parent by catering to your children's every whim. Don't give in to all their insistence, make them aware of the situation.

11) Don't worry about letting children play, fall and spoil clothes  during vacations.

12) Teach swimming to children during vacations ,teach them field games.

13) Express your joy with children.

14) Make children study for 1 to 3 hours daily according to the class.

15) Teach kids to cook ask them to cook ,their favourite dishes.

16) Teach your children to care for the environment.

17) Include the habit of exploring something new in children during vacations .

18) Develop responsible habits in children. for example ask them to clean their room after themselves.

19) Parents should develop new skills with children.

Teachers and you parents together let us all make the future citizens of tomorrow.

So let's all become devoted citizens of tomorrow.

   "Things parents should do for kids on vacation"

By - Ram Govardhan Dole 

मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.

  मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.

मराठी म्हणी हा मराठी भाषा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.
मराठी म्हणी व अर्थ 


    म्हण म्हणजे लोकांच्या सतत बोलण्यात येणारे लहान, चिमुकले, चटकदार, बोधप्रत सामान्यत: ज्ञात मार्मिक वाक्य आहे.



म्हणी म्हणजे पारंपरिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.

जी वाक्यरचना बोलणाऱ्याच्या मनातील एक वेगळा अनुभव व्यक्त करते.

म्हणी म्हणजे एक वेगळ्या धाटणीचे बोलणे, म्हणी बोलण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते.

मराठी म्हणी व अर्थ 

* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा -

अतिशहाणपण नुकसान कारक ठरते.

* अति तिथे माती

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

* अंथरूण पाहून पाय पसरावे-

आपल्या ऐपती प्रमाणे खर्च करावा.

* आयत्या बिळावर नागोबा-

दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.

* आधी पोटोबा मग विठोबा- 

प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा .

* आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे-

अपेक्षा पेक्षा किती जरी जास्त फायदा होणे.

* आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास-

एखादी गोष्ट करायला आणि अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.

* अडला हरी गाढवाचे पाय धरी-

थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते.

* आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार-

स्वतःजवळ नाही तर दुसऱ्यास काय देणार.

* अंगापेक्षा बोंगा मोठा-

खऱ्या गोष्टी पेक्षा त्याचे अवडांबरच मोठे.

* आपला हात जगन्नाथ-

आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.

* आंधळे दळते नी कुत्र पीठ खाते-

एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.

* इकडे आड तिकडे विहीर-

दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

* उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग-

उतावळ पणाने मूर्खासारखे वर्तन करणे.

* उथळ पाण्याला खळखळाट फार-

अंगी गुण थोडे असणारा बढाई जास्त मारतो.

  'मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.'

* उंदराला मांजर साक्ष-

वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.

* एका हाताने टाळी वाजत नाही-

भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही.

* ऐकावे जनाचे करावे मनाचे-

अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

* एक ना धड भाराभर चिंध्या-

एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.

* एका किंवा एकाच माळेचे मणी-

सगळीच माणसे सारखे स्वभावाची.

* कर नाही त्याला डर कशाला-

निरपराधी माणूस निर्भय असतो.

* करावे तसे भरावे-

वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

* काप गेले नी भोके राहिली-

वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.

* कामापुरता मामा-

काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.

* कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

शूद्र माणसाच्या निंदने थोरांचे नुकसान होत नाही.

* कसायला गायधार्जीनी- 

दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात.

* काखेत काळसा नि गावाला वळसा-

हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे

* कोळसा उघळावा तितका काळाच -

वाईट गोष्टी कितीही तपासली तरीही त्यातून वाईटच निघणार.

* कोल्हा काकडीला राजी-

शूद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.

* कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ-

आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.

* खान तशी माती-

आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक असते.

* खायला काळ भुईला भार-

 निरूधोगी  मनुष्य सर्वांना भारभुत होतो.

* खाई त्याला खवखवे-

वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

* खोट्याच्या कपाळी गोटा-

वाईट काम करणाऱ्या चेच नुकसान होते.

* गर्वाचे घर खाली-

घमेंडखोर  माणसावर नाचक्कीची वेळ येते.

* गरज सरो वैद्य मरो-

गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरणे.

* गरजेल तो पडेल काय?-

केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.

* गाढवाला गुळाची चव काय?

मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

* गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता-

मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो.

* गुरुची विद्या गुरुला फळली-

एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटने.

* गाड्या बरोबर नळ्याची यात्रा-

मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.

* गोगलगाय अन् पोटात पाय-

एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

* गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ-

मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृती करणार.

* घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे-

स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.

* घरोघरी मातीच्या चुली-

सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

* घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात-

प्रतिकूल परिस्थितीत सारखेच उलट वागू लागतात.

* चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे-

प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.

* चोराच्या उलट्या बोंबा- 

स्वतः च गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

* चोराच्या मनात चांदणे-

वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

* चोर सोडून संन्यासाला सुळी देणे-

खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

* चोराच्या हातची लंगोटी--

लबाड, कंजूषाकडून थोडे मिळाले तरी भाग्याचे.

* जाळ्यात राहून माशाशी वैर -

सहवासात राहायच्या व्यक्तीशी वैर करू नये.

* जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही- 

मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.

* ज्याच्या हाती ससा तो पारधी-

ज्याला यश आले तो कर्तबगार.

* ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी-

एकमेकांची वर्मे माहीत असलेल्या माणसांशी गाठ पडणे.

* ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे-

एखाद्याचे भले करायला जावे तर त्याच्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो.

* ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी-

उपकार कर्त्याचे उपकार स्मरून त्याची बाजू घेणे.

* झाकली मूठ सव्वा लाखाची-

व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते , मौन पाळून अब्रू राखणे.

* टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही-

कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.

* डोळ्यात केर आणि कानात फुंकर-

रोग एका जागी पण इलाज दुसरीकडे करणे.

* डोंगर पोखरून उंदीर काढणे

डोंगराएवढे ( खूप) कष्ट करून लहान सा मोबदला मिळविणे.

* डोळ्यापुढे काजवे दिसणे-

खूप भीती वाटणे त्रास होणे

* ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला-

संगतीमुळे चांगल्या पेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.

* तळे राखी तो पाणी चाखी-

स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.

* ताकापुरते रामायण-

एखाद्या कडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.

* तहान लागल्यावर विहीर खणणे -

आयत्यावेळी कोणतीही गोष्ट होत नसते.

* ताकाला जाऊन भांडे लपवणे

मनातील हेतू स्पष्ट न करता आढेवेढे घेऊन नंतर सांगणे.

* तन खाई धन-

वरवर क्षूल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते.

* ता म्हणता ताक भात समजावा- 

थोडेसे सांगण्यावरून सर्व गोष्टी आता त्यांनी समजून घेणे.

* तेल गेले, तूप गेले ,हाती राहिले धुपाटने -

स्वतःच्या मूर्खपणामुळे दोन्हीकडून नुकसान होते व हाती काहीच राहत नाही.

* तोंड धरून बुक्क्यांचा मार-

स्वतःचा अपराध असूनही दुसऱ्याला विनाकारण शिक्षा करून त्यासाठी त्याला तक्रारही करू न देणे.

* थेंबे थेंबे तळे साचे-

हळूहळू संचय करणे

* दगडापेक्षा वीट मऊ-

निरुपाय म्हणून मोठ्या संघटापेक्षा लहान संकट कमी नुकसानीचे म्हणून स्वीकारणे.

* दृष्टी आड सृष्टी -

आपल्या मागे काय चालते आहे ते दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे.

* दाम करी काम ,बीबी करी सलाम-

पैसा आहे तर मान आहे पैशाने खूप कामे पार पाडता येतात.

* दिव्याखाली अंधार- 

दिवा दुसऱ्याला उजेड देत असला तरी त्याच्या खाली अंधारच असतो, तसेच चांगले माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो.

* दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा फुंकून पितात- 

एकदा आददल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीत सुद्धा काळजी घेतो.

* दुष्काळात तेरावा महिना-

संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे.

* दुरून डोंगर साजरे-

अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.

* दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही-

दुसऱ्यांची शुल्लक चूक असली तरी ती दिसते ,पण स्वतःच्या अंगी असलेला मोठा दोष दिसत नाही.

* देश तसा वेश -

परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे.

* दैव देते पण कर्म नेते-

सुदैवाने एखादी गोष्ट लाभते पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसानही होऊ शकते.

* दोन्ही घरचा पाहुणा उपाशी-

दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो.

* धर्म करता कर्म उभे राहते-

दुसऱ्यावर उपकार करावयास जाऊन स्वतःवरच संकट ओढून घेणे.

* धर्मावर सोमवार सोडणे-

स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.

* नव्याचे नऊ दिवस -

नवीन वस्तूचे आकर्षण थोडेसे दिवस टिकते.

* न करता वार शनिवार- 

एखादे काम मनापासून करायचे नसले की कोणतेतरी शिल्लक कारण सांगून ते काम टाळणे.

* नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्णे -

दोषाने युक्त असलेले काम करीत असता एकामागून एक अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.

* नाक दाबले म्हणजे तोंड उघडते-

एखाद्याला पेचात अडकविल्याशिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे कबूल करणार नाही.

* नावडतीचे मीठ आळणी -

नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती वाईटच दिसते.

* नाचता येईना अंगण वाकडे - 

आपल्याला एखादे काम येत नसल्यास स्वतःचा कमीपणा लपविण्यासाठी संबंधित दुसऱ्या गोष्टीतील दोष दाखविणे.

* नाव मोठे लक्षण खोटे -

कीर्ती मोठी असली तरी कृती मात्र नावाला खोटेपणा आणणारी.

* नाकापेक्षा मोती जड-

एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व द्यावयाचे.

* पळसाला पाने तीनच-

सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

* पदरी पडले पवित्र झाले-

कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे न ठेवता तिच्या बाबतीत समाधान मानावे.

* पालथ्या घड्यावर पाणी-

एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे.

* पायातली वाहन पायात बरी-

प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे.

* पाचही बोटे सारखी नसतात-

कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टी सारखी असू शकत नाही ,सर्व माणसे सारखे स्वभावाचे असू शकत नाही.

* पाठीवर मारा पोटावर मारू नका-

शारीरिक शिक्षा करावी पण पोटापाण्याची कमी करू नये.

* पी हळद आणि हो गोरी-

कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करू नये.

* पुढच्याला ठेच मागचा शहाणा-

दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन मनुष्य स्वतः शहाणा होतो व सावधगिरीने वागतो.

* पोटात एक ओठात एक-

लबाड माणसांचे विचार अनेक असतात त्यांच्या मनात एक असते व बोलतात दुसरेच.

* फुल ना फुलाची पाकळी- 

जितके आपल्याला द्यायला पाहिजे तितके देणे जमत नसल्यास शक्य आहे तेवढेच देणे.

* बळी तो कानपिळी -

ज्या मनुष्याच्या अंगी पैशाचे ,अधिकाराचे, वशिल्याचे व शक्तीचे बळ असते. तो इतरांना छळतो किंवा त्यांच्यावर सत्ता चालवितो.

बसता लाथ उठता बुक्की- 

नेहमी शिक्षा करीत असणे.

* बडा घर पोकळ वासा-

दिसण्याची पण प्रत्यक्षात काही नसणे.

* बाप तसा बेटा-

जे वडिलांच्या अंगी चांगले किंवा वाईट गुण असतील ते मुलाच्या अंगी उतरणे.

* बुडत्याचा पाय खोलात-

ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत एका मागून एक असे येणाऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते.

* बुडत्याला काठीचा आधार-

मोठ्या संकटात सापडलेल्या माणसाला वेळप्रसंगी कोणी थोडीशी मदत केली तरी त्याला महत्त्व असते.

* बैल गेला आणि झोपा केला- 

एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.

* बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले-

आपल्या बोलण्याप्रमाणे जो वागतो त्या माणसाला मान दिला पाहिजे.

* बोलाचीच कढी व बोलाचाच भात- 

नुसतीच बडबड कृती मात्र काहीच नसते.

* भरवशाच्या म्हशीला टोणगा-

ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याने आयत्यावेळी दगा देणे.

* मरावे परी कीर्ती रुपी उरावे-

मनुष्य देहाने मरतो ,पण त्याने केलेल्या चांगल्या कामाच्या रूपाने जिवंत राहतो.

* मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी-

एखादी दिसण्यात सोपी व करण्यास कठीण अशी गोष्ट कोणी सहसा करायला पुढे येत नाही.

* मानला तर देव नाहीतर धोंडा

एखाद्याचा मान ठेवला तर ठेवला नाही तर नाही.

* मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-

लहानपणी मोठेपणीच्या कर्तुत्वासंबंधी किंवा गुणदोषासंबंधी अंदाज लागतो.

* मुठभर मिशा हातभर दाढी-

एखाद्याचा एकच अवयव प्रमाणाबाहेर असतो तेव्हा त्याच्या बेडोलपणाचा उपहास करतात.

* यथा राजा तथा प्रजा-

अधिकारा वरील लोक जसे वागतात तसेच सामान्य लोकही वागतात.

* रात्र थोडी सोंगे फार-

वेळापूर आपण काम मात्र भरपूर.

* राजाला दिवाळी काय माहित-

जो मनुष्य नेहमी सुखात असतो त्याला कोणताच एक दिवस आनंदाचा असा नसतोच.

* रोज मरे त्याला कोण रडे 

रोजच संकट येऊ लागली की त्याचे काहीच वाटेनासे होते.

* लाथ मारीन तेथे पाणी काढीन

सामर्थ्यवान व हुशार मनुष्य

* लेकीस बोले सुनेस लागे -

एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

* लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण

इतरांना उपदेश करायचा, आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

* वराती मागून घोडे

योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. येऊ

* वडाची साल पिंपळाला लावणे

खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगणे.

* वासरात लंगडी गाय शहाणी

अडाणी माणसात थोडासा शिकलेला माणूस ही पंडित म्हणून घेतो.

* वळणाचे पाणी वळणानेच जाणार- 

निसर्ग नियमाप्रमाणे सर्व गोष्टी होतात.

* वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे- 

सर्व गोष्टींची संधी आली असता ,होईल तो फायदा करून घ्यावा.

* विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर- 

निश्चित निवारा नसणे ,थोडासा संसार नेहमी आपल्याबरोबर बाळगणे.

* शहाण्याला शब्दांचा मार-

शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दांनी समज दिली तरी पुरेशी असते.

* शितावरून भाताची परीक्षा

थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची कल्पना करता येते.

* शेरास सव्वाशेर

प्रतिपक्षापेक्षा वरच्या प्रतीचा एक वस्ताद तर दुसरा त्याहून सरस.

* सत्तेपुढे शहाणपणा नाही- 

ज्याच्या हाती अधिकाराचे बळ असते त्याच्यापुढे शहाण्या माणसाचे काही चालत नाही.

* सरड्याची धाव कुंपणापर्यंत -

अल्प बुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते.

* स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही- 

स्वतः अनुभवल्याशिवाय एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना येत नाही.

* साखरेचे खाणार त्याला देव देणार-

भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीची अनुकूलता असते.

* सुताने स्वर्ग गाठणे -

क्षुल्लक गोष्टीवरून नको त्या गोष्टीचा उठा ठेव करणे.

* हजीर तो वजीर - 

जो ऐनवेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.

* हत्ती गेला पण शेपूट राहिले-

कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा भाग व्हायचा राहिला.

* हसतील त्याचे दात दिसतील-

लोकांच्या हसण्याची परवा न करणे.

* हातच्या काकणाला आरसा कशाला- 

जी गोष्ट स्पष्ट किंवा उघड आहे ती दाखविण्यासाठी पुराव्याची जरुरी लागत नाही.

   

     मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.

श्री राम गोवर्धन डोळे

















भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती (2023)

  

भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती  (2023)

भारताचे व महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उच्चपदस्थ व्यक्ती कोण आहेत? यांच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती
भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती

भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती

राष्ट्रपती :  द्रोपदी मुर्मू

उपराष्ट्रपती : जगदीश धनखड

पंतप्रधान : नरेंद्र मोदी

केंद्रीय गृहमंत्री: अमित शहा

लोकसभापती: ओम बिर्ला

लोकसभा उपसभापती: रिक्त

राज्यसभा अध्यक्ष:  जगदीश धनखड 

राज्यसभा उपाध्यक्ष: हरिवंश नारायण सिंग

सरन्यायाधीश न्यायमूर्ती: धनंजय चंद्रचूड

मुख्य निवडणूक आयुक्त :राजीव कुमार

महान्यायवादी :आर वेंकटरमणी 

सेना अध्यक्ष सीडीएस :अनिल चव्हाण 

 भूदल प्रमुख: मनोज पांडे

नौदल  प्रमुख: हरी कुमार

वायुदल प्रमुख :वी आर चौधरी

सीबीआय( CBI )संचालक :सुबोध कुमार जयस्वाल

केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख: सुरेश पटेल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार :अजित डोवल

रॉ चे संचालक :सामंत गोयल

इस्रोचे प्रमुख :एस सोमनाथ

 डीआरडीओ(DRDO )चे संचालक :समीर काम

राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष: रेखा शर्मा 

राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष: ए.के .मिश्रा 

मागासवर्गीय आयोग अध्यक्ष :हंसराज अहिर 

नीती आयोगाचे अध्यक्ष: नरेंद्र मोदी 

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी( CEO): बी.व्ही.आर सुब्रमण्यम

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष : रंजना देसाई 

         'भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती'


महाराष्ट्राचे उच्चपदस्थ व्यक्ती

राज्यपाल: रमेश बैस

मुख्यमंत्री:  एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

गृहमंत्री: देवेंद्र फडणवीस 

विधानसभा सभापती: राहुल नार्वेकर

विधानसभा उपसभापती :नरहरी झिरवळ

विधानसभा विरोधी पक्ष नेते :अजित पवार

विधान परिषद अध्यक्ष :रामराजे निंबाळकर

विधान परिषद उपाध्यक्ष :नीलम गोऱ्हे

विधान परिषद विरोधी पक्ष नेते :अंबादास दानवे

महाधिवक्ता: बिरेंद्र सराफ 

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश :संजय वी गंगापूर वाला

निवडणूक आयुक्त: यु.पी.एस मदान 

मुख्य सचिव: मनु कुमार श्रीवास्तव 

पोलीस महासंचालक: रजनीश शेठ

मुंबई पोलीस आयुक्त: विवेक फळशनकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष: किशोर राजे निंबाळकर

लोकायुक्त : न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे

राज्य मानवी हक्क आयुक्त:  न्यायमूर्ती के. के .तातेड

राज्य महिला आयोग अध्यक्ष : रुपाली चाकणकर

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष: सुशीबेन शहा

मुंबई महानगरपालिका आयुक्त: इक्बाल सिंह चहल

मुख्य माहिती आयुक्त: सुमित मल्लिक

महाराष्ट्र राज्याचे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष :आनंद निरगुल 


  "भारताचे उच्चपदस्थ व्यक्ती व महाराष्ट्र राज्याचे उच्चपदस्थ व्यक्ती"

श्री राम गोवर्धन डोळे 













राज्यातील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करणे बाबत...

 राज्यातील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करणे बाबत...

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करणे बाबत...

राज्य मंडळ राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळा मधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुट्टी जाहीर.

शासन परिपत्रक :  दिनांक: २०.०४.२०२३

राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 त्यानुसार या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .

२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास ,विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

         राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याचे पुढील दिवशी सुरू होतील .

         सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२३०४२०२००३३८८४२१ असा आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

                                     (  इ.मु. काझी )      

                          V   सह सचिव ,महाराष्ट्र शासन

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे - National Education Policy 2020

 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांनी केली आहे.

      केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे .तब्बल 34 वर्षानंतर देशात शैक्षणिक धोरण लागू होणार आहे .महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. चला तर पाहूया नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत कोणते -कोणते बदल करण्यात आले आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 

भारतात आजपर्यंत एकूण चार शैक्षणिक धोरण आहेत. पहिले शैक्षणिक धोरण 1968 मध्ये ,दुसरे 1986 मध्ये तयार करण्यात आले आहे ,तिसरे शैक्षणिक धोरण 1992  मध्ये करण्यात आले आणि आता चौथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. नवीन शिक्षण धोरण तब्बल 34 वर्षानंतर बदलले आहे.

* शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे आणि भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

* नवीन शैक्षणिक धोरण हे पाच स्तंभावर लक्ष केंद्रित करते : प्रवेश, , समानता ,गुणवत्ता, परवडणारी आणि जबाबदारी.

नवीन शिक्षण धोरणाची(NEP )ठळक वैशिष्ट्ये : 

नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट भारतातील सर्व मुलांना दर्जेदार आणि न्याय्य शिक्षण देण्याचे आहे. धोरणातील काही प्रमुख ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत...

3 ते 14 वर्षे वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट 6 ते 14 वर्षे होता.

* बोर्ड फक्त बारावीच्या वर्गाला असेल.

* महाविद्यालयीन पदवी चार वर्षाची असेल.

* दहावी मंडळ रद्द

* एम फिल बंद असेल.

* नववी ते बारावीच्या सत्र परीक्षा असतील.( semester Exam)

* शालेय शिक्षण 5+3+3+4 या सूत्राच्या अंतर्गत शिकवले जाईल. यापूर्वी 10+2 असे सूत्र होते.

* इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश.

* पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न.

* विद्यार्थ्यांचं ते स्वतः, सह विद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार.

* पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न करता विषय निवडण्याची मुभा.

* सरकारी आणि खाजगी शाळा मधील शिक्षणात समानता.

चला तर पाहूया नवीन शिक्षण धोरणाचे सूत्र 5+3+3+4म्हणजे काय?

* 5 वर्षे मूलभूत (Fundamental)

1) नर्सरी - 4 वर्षे

2) ज्युनिअर केजी- 5 वर्षे

3) सिनियर केजी -6 वर्षे

4) इयत्ता पहिली- 7 वर्षे

5) इयत्ता दुसरी- 8वर्षे

* 3 वर्षाची प्रारंभिक शाळा

1) इयत्ता तिसरी- 9 वर्षे

2) इयत्ता चौथी- 10 वर्षे

3) इयत्ता पाचवी- 11 वर्षे

* 3 वर्षांची माध्यमिक शाळा

1) इयत्ता सहावी- 12 वर्षे

2) इयत्ता सातवी- 13 वर्षे

3) इयत्ता आठवी- 14 वर्षे

* 4 वर्षे माध्यमिक शाळा

1) इयत्ता नववी- 15 वर्षे

2) इयत्ता दहावी- 16 वर्षे

3) इयत्ता अकरावी- 17 वर्षे

4) इयत्ता बारावी- 18 वर्षे                                                      #

'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे'

या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सूत्राची माहिती पुढील प्रमाणे-

# पायाभूत टप्पा ( 5 वर्षे)

या टप्प्यात मुलाच्या शिक्षणाची पहिली पाच वर्षे समाविष्ट असतील. शिक्षणाच्या पहिल्या तीन वर्षात मुलांना जवळील अंगणवाडी ,बाल वाटिका किंवा समुदायावर आधारित नर्सरीमध्ये शिकवले जाईल. शाळेच्या इतर दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्याला विविध स्तरावर खेळ आधारित क्रिया ,कला आधारित शिक्षणाद्वारे मूलभूत कौशल्य आणि ज्ञान शिकविले जाईल.

# तयारीचा टप्पा (3 वर्षे )

या टप्प्यामध्ये 8 ते 11 वयोगटातील विद्यार्थी असतील त्यांच्यामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्य विकसित करण्यासह मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल .पूर्वतयारीचा टप्पा विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील संकल्पना समजून घेण्यास मदत करेल.

# मध्यम अवस्था (3वर्षे)

या टप्प्यामध्ये 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांना वाचन ,लेखन ,मूलभूत भाषा कौशल्ये यासारखी मूलभूत शैक्षणिक कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.त्यांच्याकडून टीमवर्क, समस्या सोडवणे ,विचार करणे यासारखे जीवन कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे.

# माध्यमिक टप्पा ( 4वर्षे)

या टप्प्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थी असतील या टप्प्यात त्यांना इंग्रजी ,गणित ,विज्ञान आणि सामाजिक अभ्यास यांचा समावेश असलेला मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना भाषा , कला ,  व्यावसायिक विषयासह विविध निवडकांमधून निवड करण्याची संधी असेल.

महत्वाचे मुद्दे : 

* आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांची मातृभाषा, त्यांची स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकवली जाईल. इतर विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकवला जाईल.

* आता दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक नाही आता फक्त बोर्ड परीक्षा बारावी मध्ये द्यावी लागेल.

* महाविद्यालयीन पदवी आता तीन व चार वर्षाची असेल म्हणजेच, पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र (certificate)मिळेल, दुसऱ्या वर्षी पदविका असेल आणि तिसऱ्या वर्षी डिग्री मिळेल.

* केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे.

* या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, अनेक संस्था स्थापन केल्या जातील जेणेकरून हे धोरण सुरळीत चालेल.

* नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अभ्यासक्रम मध्यभागी सोडून ,दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल ,तर तो पहिला अभ्यासक्रमातून ठराविक काळासाठी ब्रेक घेऊन दुसऱ्या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतो.

* नवीन राष्ट्रीय धोरणाचे उद्दिष्ट शिक्षणावर भर देऊन पाठ्यपुस्तकावरचे अवलंबित्व कमी करण्याचे आहे.

या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण तसेच व्यावसायिक कौशल्याचा विकास होऊन तो शासनाला नोकरी मागणारा नाही , तर इतरांना नोकरी देणारं होईल व पुढील भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या दृष्टीचा विकास होईल असे या धोरणावरून मला वाटते.

या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू तसेच देशाची वाटचाल उज्वल भवितव्याकडे होणार हे निश्चित.

" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 महत्त्वाचे मुद्दे"

श्री राम गोवर्धन डोळे 




संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून करण्याबाबत... शासन निर्णय


संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून  करण्याबाबत... शासन निर्णय

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.....

संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून  करण्याबाबत

संप काळातील कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून  करण्याबाबत..



शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2023...

प्रस्तावना: बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी /अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्रमांक 2 येथील दि. 28 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये "असाधारण रजा "म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी " असाधारण रजा "ऐवजी "अर्जीत रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

  शासन निर्णय:-

          बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च  2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी /अधिकारी सहभागी झाले होते ,त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोद्धारण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

       सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202304131612516907असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे.

   महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

                                             अ. म. चेमटे

                                     अवर सचिव ,महाराष्ट्र शासन

विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत...

 विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत...

आज कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यांना विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) व केंद्रप्रमुख यांच्या पदांच्या भरती बाबत, मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आलेला आहे..

विस्तार अधिकारी ( शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत..
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत..


प्रति,

विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त कार्यालये ( सर्व)

   विषय: विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत...

संदर्भ : शासनाचे समक क्रमांकाचे दिनांक 05.05.2022 चे पत्र 

उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.

          शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील  विस्ताराधिकारी( शिक्षण )व केंद्रप्रमुख हि पदे महत्वाची असून राज्यांमध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

           या विभागाच्या दि.10.06.2014 च्या आधी सूचनेतील तरतुदीनुसार आपल्या अधिपत्याखालील विस्तार अधिकारी( शिक्षण) या पदावरील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदरची पदे भरण्याबाबत संदर्भातील पत्रान्वे निर्देश दिलेले होते .तथापि, प्रस्तुत प्रकरणी केलेल्या कार्यवाही बाबत शासनास काहीच अवगत करण्यात आलेले नाही .

        तरी उक्त नमूद दिनांक 10.06.2014 च्या आधी सूचनेनुसार विस्तार अधिकारी( शिक्षण) (श्रेणी -2 )व विस्तार अधिकारी (शिक्षण) ( श्रेणी -3) संवर्गातील तालुका निहाय मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील  est14-rdd@mah.gov.in  या ईमेलवर दिनांक  10.04.2023पर्यंत पाठविण्यात यावा ही विनंती.


                             कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन





माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार.... कारण वाचा

 

माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार.... कारण वाचा

ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2023 मध्ये पहिली ला जाणार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती...



आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे खूप महाग होत चाललेले आहे असे म्हणतात की, आजचे शिक्षण हे गरिबांचं नाही.... पण जर आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत टाकली तर ते नक्कीच 100% यशस्वी होतील.

     नमस्कार पालकांनो

आपला मुलगा जर 2023 मध्ये इयत्ता पहिली ला जाणार असेल तर तुम्ही त्यास जर इंग्रजी माध्यमाला घातले तर तुम्हाला कमीत कमी फी मुंबई ,पुण्याला तर 30हजार ते 1लाखाच्या आसपास असेल. ग्रामीण भागामध्ये पण इंग्रजी माध्यम फी जवळपास 20हजार ते 50हजार च्या आसपास आहे.... असेच जर तुम्ही नोकरी लागेपर्यंत ती भरत गेलात तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा की तुमची फी किती जाते....

एवढी फी भरून सुद्धा नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही आहे सध्याच्या काळात...

जर मी माझा मुलगा इंग्रजी माध्यमाला न घालता जिल्हा परिषद शाळेत घातला आणि त्याला जी फी भरायची आहे ती फी मी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवली उदा. रिलायन्स ,टाटा, मारुती सुझुकी, बजाज, इन्फोसिस, विप्रो ,एच एफ डी सी बँक... यासारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे जर शेअर्स मी खरेदी केले तर ...

      'माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार '. कारण वाचा

समजा त्याला पहिलीला पन्नास हजार भरायचे आहेत. ते पन्नास हजार मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,दुसरीला जी 60000 भरायचे ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,तिसरीला 70 हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,चौथीला ८० हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,असं करत करत त्याचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत ,पंधरा ते सोळा वर्षे पैसे शेअर मार्केटमध्ये असणार आणि त्याची किंमत आता पहिल्या पन्नास हजाराची जवळपास तीस ते चाळीस लाख झाले असणार... असे सर्व जवळपास त्याचे शिक्षण होईपर्यंत अंदाजे आठ ते नऊ कोटी रुपये मिळतील.

     आणि जर जिल्हा परिषद मध्ये घातले तर मुलगा कर्तत्ववान असेल तर तो स्वतःची प्रगती करेलच कारण इंग्रजीमध्ये फी भरून  कर्तत्ववान होईल याची खात्री देणारी एकही इंग्रजी शाळा आज उपलब्ध नाही.

 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असा तयार होतो. आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही उत्कृष्ट शिक्षण देत आहेत..

    म्हणूनच मी माझा मुलगाही जिल्हा परिषद शाळेत घालणार आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणार आहे.

   जर तुम्ही तुमचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत घातला तर जिल्हा परिषद शाळा ही वाचतील ,मातृभाषेतून शिक्षणही मिळेल आणि   एका वडिलांची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल..

  मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही उलट तोच इतरांना रोजगार देऊ शकेल.

बघा विचार करा आणि पटलं तर इतरांना शेअर करा...

    "माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार".... कारण वाचा



स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे- Spardha pariksha sathi mahtvache bhumitiche niyam v sutre

 एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगात वावरताना प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे. ही तयारी योग्य प्रकारे झाली पाहिजे म्हणूनच भूमिती विषयाचे महत्त्वाचे नियम व सूत्रे आपण पाहणार आहोत.

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे- 


* बिंदू : अतिशय अणकुचीदार टोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू असे म्हणतात.

* रेषाखंड : रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड म्हणतात.

* रेषा : रेषा म्हणजे अनंतबिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो.

* दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते.

* एका बिंदूतून असंख्य रेषा जातात.

* एका रेषेवर अनंत बिंदू असतात.

* एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात.

* रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते.

* तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा करता येत असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात.

* जेव्हा तीन किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू म्हणतात.

* एकाच बिंदूत छेदणाऱ्या तीन किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांचे छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात.

* समांतर रेषा : 

* एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात.

* एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात.

* दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत.

* किरण : एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात.

* जेव्हा दोन किरणांचा आरंभबिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात.

* प्रतल: अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात.

* प्रतल अनंतबिंदूंनी बनलेले असते.

* तीन नैकरेषेबिंदूतून फक्त एकच प्रतल जाते.

* परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते.

* जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात.

* कोन: एकच आरंभबिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन म्हणतात.

* किरणांच्या संयोग संचाला कोन म्हणतात.

* कोन मोजण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोनमापकाचा वापर करतात.

* शून्य अंश मापाच्या कोणाला शुन्यकोन म्हणतात.

* लघुकोनाचे माप 0 अंश पेक्षा जास्त व 90 अंश पेक्षा कमी असते.

* काटकोनाचे माप 90 अंश असते.

* विशाल कोनाचे माप 90 अंश पेक्षा जास्त व 180 अंश पेक्षा कमी असते.

* 180 अंश मापाच्या कोनाला सरळकोन म्हणतात.

* प्रविशाल कोनाचे माप 180 अंश पेक्षा जास्त व 360 अंश पेक्षा कमी असते.

* पूर्ण कोना चे माप 360 अंश असते.

* ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या दोन कोनाला परस्परांचे पूरक कोन म्हणतात.

* ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोनाला परस्परांचे कोटीकोन म्हणतात.

 ' स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे'

* कोनाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोनाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोनाचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोनदुभाजक म्हणतात.

* छेदिका: जेव्हा एखादी रेषा एका प्रतलातील दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला छेदिका म्हणतात.

* जर छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असेल,तर प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.

* दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता मिळणाऱ्या संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात.

* त्रिकोण: तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण म्हणतात.

* त्रिकोणाला तीन कोन, तीन बाजू, तीन शिरोबिंदू असतात.

* त्रिकोणाच्या बाजू व त्रिकोणाचे कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात.

* त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते.

* त्रिकोणाच्या बाह्य कोना चे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते.

* त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंबरेषा खंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात.

* त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात.

* त्रिकोणात एक काटकोन व दोन कोन लघुकोन असल्यास त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात.

* त्रिकोणात तिन्ही कोनाची मापे 90 अंश पेक्षा कमी असल्यास त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात.

* त्रिकोणात एका कोनाचे माप 90 अंश पेक्षा जास्त व दोन कोन लघुकोन असल्यास त्याला विशालकोन त्रिकोण म्हणतात.

* ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात.

* ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात.

* ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात.

* चौकोन : चार बाजूंनी बंदिस्त असलेल्याआकृतीस चौकोन म्हणतात.

* चौकोनाला चार बाजू, चार कोन ,चार शिरोबिंदू व दोन कर्ण असतात.

* चौकोनाच्या चार कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश असते.

* चौरस : चौकोनाच्या चार समान लांबीच्या बाजूने बंदीस्त असलेल्या आकृतीस चौरस म्हणतात.

* चौरसाचे कर्ण एकरूप असतात.

* चौरसाचे चारही कोन काटकोन असतात.

* चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात.

* चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो.

* आयत: ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनास आयत किंवा काटकोन चौकोन म्हणतात.

* आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात.

* आयताचे  कोन एकरूप असतात.

* आयताच्या संमुख बाजू एकरूप असतात.

* आयताचा प्रत्येक कर्ण आयताला  दुभागतो.

* समांतरभुज चौकोन : ज्या चौकोनाच्या संमुख बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन म्हणतात.

* समांतरभुज चौकोनाच्या संमुख बाजू एकरूप असतात.

* समांतरभुज चौकोनात  संमुख कोन एकरूप असतात.

* समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.

* समभुज चौकोन : ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनास समभुज चौकोन म्हणतात.

* समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात.

* समभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

* समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोनाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोन दुभागतात.

* समलंब चौकोन : ज्या चौकोनात संमुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते त्या चौकोनास समलंब चौकोन म्हणतात.

* पतंग किंवा पतंगाकृती चौकोन: ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात अशा चौकोनाला पतंग किंवा पतंगाकृती चौकोन म्हणतात.

* पतंगाचे कर्ण परस्परांना लंब असतात.

* पतंगात संमुख कोनाची एक जोडी एकरूप असते.

* वर्तुळ: प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय.

* वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

* एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात.

* एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीचा असतात.

* वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते.

* त्रिज्या = व्यास ÷ 2

* वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडात जीवा म्हणतात.

* एका वर्तुळाला असंख्य जीवा असतात.

* वर्तुळाच्या सर्व जीवा असमान लांबीच्या असतात.

* जी जीवा वर्तुळ मध्यातून (केंद्रातून )जाते त्या जिवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात.

* एका वर्तुळाला असंख्य व्यास असतात.

* व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.

* एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात.

* वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.

* वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो.

* व्यास= 2× त्रिज्या

* वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात.

* वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ होय.

* वर्तुळाचा परीघ = 2 × π × त्रिज्या

  ( π या अपरिमेय संख्येची किंमत सोयीसाठी 22/7 किंवा 3.14 ही घेतात.)

* वर्तुळाकार कडेच्या आतील बाजूला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात.

* वर्तुळाकार कडेच्या बाहेरील बाजूला वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात.

* वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग होतात, यापैकी प्रत्येक भागाला वर्तुळकंस म्हणतात.

* दशमान परिमाणे: लांबी ,वजने ,मापे इत्यादींची मॅट्रिक पद्धती ही दशमान पद्धती आहे.

* लांबी मोजण्यासाठी मिलिमीटर ,सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर ही एकके वापरतात.

* वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम ,ग्रॅम ,किलोग्रॅम ही एकके वापरतात.

* धारकता मोजण्यासाठी मिलीलिटर ,लिटर हे एकक वापरतात.

* दुपारचे बारा वाजले म्हणजे माध्यान झाले असे म्हणतात.

* दुपारी बारापासून रात्री बारा पर्यंतच्या काळास मध्यनोत्तर काळ म्हणतात.

* रात्री बारापासून दुपारी बारापर्यंतच्या काळास मध्यान पूर्व काळ म्हणतात.

* परिमिती : बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.

* त्रिकोणाची परिमिती = तीन बाजूंच्या लांबीची बेरीज 

* आयताची परिमिती= 2× लांबी+ 2 × रूंदी 

* चौरसाची परिमिती= 4× बाजू

* बहुभूजाआकृती परिमिती= सर्व बाजूंची बेरीज 

* क्षेत्रफळ : आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्र होय या क्षेत्राचे माप म्हणजेच त्याचे क्षेत्रफळ होय.

* त्रिकोणाचे क्षेत्रफळ= 1/2× पाया × उंची 

* काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ= 1/2× काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार

* समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ= √3/4× बाजू ×बाजू

* आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी 

* चौरसा चे क्षेत्रफळ= बाजू × बाजू 

* समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ= 1/2 × कर्णाच्या लांबीचा गुणाकार 

* समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची

* पतंगाकृतीचे क्षेत्रफळ = 1/2 × कर्णाच्या लांबीचा गुणाकार 

* वर्तुळाचे क्षेत्रफळ= π × त्रिज्या × त्रिज्या 

* अर्ध वर्तुळाचे क्षेत्रफळ= 1/2× π × त्रिज्या × त्रिज्या 

* त्रिमिती आकार : 

* घन : लांबी, रुंदी व उंची समान असणाऱ्या आकृतीला घन म्हणतात.

* घनाला 8 शिरोबिंदू 12 कडा व 6 चौरसाकार पृष्ठे असतात.

* घनाच्या सर्व कडा समान लांबीचे असतात.

* घनाच्या सर्व पृष्ठे समान लांबीचे असतात.

* इष्टिकाचिती : (इष्टिका म्हणजे वीट) ज्या आकृतीचा आकार विटेसारखा( म्हणजे लांबी, रुंदी व उंची वेगवेगळी) असतो त्या आकृतीला इष्टिकाचिती म्हणतात.

* इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू 12 कडा व 6 आयताकार पृष्ठ असतात.

* इष्टिकाचितीची समोरासमोरची पृष्ठ समान असतात.

* दोन घन परस्परांना जोडल्यास इष्टिकाचितीची आकृती तयार होते.

* पृष्ठफळ : पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या बाजूंचे क्षेत्रफळ होय.

* घनाच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ = बाजू ×बाजू

* घनाचे एकूण पृष्ठफळ = 6× बाजू× बाजू

* इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ = 2× ( लांबी × रूंदी+ रूंदी × उंची+ लांबी × उंची)

* घनाचे घनफळ= बाजू ×बाजू ×बाजू 

* इष्टिकाचितीचे घनफळ = लांबी× रुंदी× उंची 

"   "स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे भूमिती चे नियम व सूत्रे"


श्री राम गोवर्धन डोळे
8208505528




प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole


 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करीत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकामध्ये पुढील प्रमाणे नोंदी असाव्यात.

विद्यार्थी प्रगती पत्रक नोंदी


विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रावरील नोंदी  यामध्ये आपण विशेष प्रगती नोंदी ,आवड /छंद नोंदी ,सुधारणा आवश्यक नोंदी ,व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी यादी पुढीलप्रमाणे: 

  प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole 


विशेष प्रगती नोंदी : 

*    दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.

*    दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो.

 *    दररोज शाळेत उपस्थित राहतो.

*    परिपाठात सक्रिय सहभाग घेतो.

*    गटकार्यात उत्कृष्ट सहभाग घेतो.

*   संगणकावर छान चित्र काढतो.

*   मोबाईलचा योग्य वापर करतो.

*  मोठ्यांचा आदर करतो.

*  शालेय शिस्त आत्मसात करतो.

* इंग्रजी वाक्य बोलतो.

* पाढे पाठांतर करतो.

  *   प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.

     मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.


  * आत्मविश्वासपूर्वक बोलतो
.


   * दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
.


   *  लक्षपूर्वक
, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.


  * योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो


   * विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
.

       स्वत:हून प्रश्न विचारतो.


  *  विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.


  * बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो

  * व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.

*     भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.

*     बोधकथा,वर्तमानपत्रे,मासिके इ वाचतो माहिती सांगतो.

*     ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.

*     गोष्टी,कविता,लेख वर्णन इ.स्वरूपाने लेखन करतो.

  * मुद्देसूद लेखन करतो.

  * शुद्धलेखन अचूक करतो.


 * अचूक अनुलेखन करतो
.

 *  स्वाध्याय अचूक सोडवितो.

*  नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.

 * भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.

  * लेखनाचे नियम पाळतो.

 * लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.

* वाक्यप्रचार  अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.

* दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो.

* पाठातील शंका विचारतो.

* हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.

* गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.

* वाचनाची आवड आहे.

* कविता चालीमध्ये म्हणतो.

* शिक्षका विषयी आदर बाळगतो.

* स्वाध्याय पुस्तिका स्वतः पूर्ण करतो.

* शालेय उपक्रमात सहभाग घेतो.

* प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.

* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.

* म्हणींचा योग्य ठिकाणी वापर करतो.

* दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.

* गणितातील क्रिया अचूक करतो.

* तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.

* इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो.

* चित्राचे वर्णन करतो.

* सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

* कार्यानुभव मधील वस्तू सुबक तयार करतो.

* तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग करतो.

* नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.

* विविध वाद्य सुंदर वाजवतो.

* वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.

* कागदापासून विविध आकार तयार करतो.

* रांगोळी सुंदर काढते.

प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole 


आवड छंद: 

* अवांतर वाचन करणे.

* क्रिकेट खेळणे

* सायकल चालवणे

* चित्र काढणे.

* कागदी वस्तू बनवणे

* पर्यावरण रक्षण करणे

* वस्तूंची निगा राखणे

* स्वच्छता करणे

* मित्रांना भेटणे

* युट्युब वरून माहिती काढणे

*टीव्ही पाहणे

* बातमी पाहणे

* खोखो खेळणे

* कबड्डी खेळणे

* संगणक हाताळणे

* पोहणे

* गोष्ट ऐकणे

* गीत गायन करणे

* नृत्य करणे

* लेखन करणे 

* संग्रह करणे 

'प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole '

* व्यायाम करणे

* गेम खेळणे

* प्रतिकृती बनवणे

* नाण्यांचा संग्रह करणे

* गोष्टींचा संग्रह करणे

* सुविचार वाचणे

* वर्तमानपत्र वाचणे

* संगीत ऐकणे

* गाणी म्हणणे

 * संगणकावर काम करणे

* प्रयोग करणे

* कविता गायन करणे

* उपक्रम करणे

* बडबड गीतांचा संग्रह करणे

*इतरांना मदत करणे

* शुद्धलेखन लिहिणे

* नक्षीकाम करणे

* गटचर्चा करणे

* प्रार्थनांचा संग्रह करणे

* सूत्रांचा संग्रह करणे

* गणिती नियम पाठ करणे

* पाढे पाठ करणे

* इतरांची मुलाखत घेणे

* बातमी सांगणे

* गप्पा मारणे

* सुविचार संग्रह करणे

* वर्तमानपत्रातील कात्रणे संग्रह करणे

* खेळाडू चित्रसंग्रह करणे

* शास्त्रज्ञ चित्र संग्रह करणे

* स्पर्धा परीक्षा अभ्यास करणे

* प्रवास करणे

* विविध ठिकाणाची माहिती घेणे

* बैलगाडी चालवणे

* प्राण्यांची काळजी घेणे


आवश्यक सुधारणा :

* अभ्यासात सातत्य असावे.

*स्पष्ट वाचन करावे.

* अवांतर वाचन करावे.

* अक्षर वळणदार काढावे.

* इंग्रजी शब्द संग्रह वाढविणे.

* जोडाक्षरे वाचन करणे.

* इंग्रजी वाचन सुधारणे.

* इंग्रजी शब्द पाठ करणे.

* नियमित अभ्यास करावा.

* नियमित शाळेत यावे.

* गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

* गणितातील सूत्रे पाठ करावे.

* गणिती क्रिया सराव करावा.

* खेळात सहभागी व्हावे.

* गणित पाढे पाठ करावे.

* म्हणी पाठांतर करावेत.

* वाक्प्रचार पाठ करावे.

* सुविचार पाठ करावे.

* गणिताचा व्यवहार ज्ञानात उपयोग करावा.

* इंग्रजी बोलणे सराव करावा.

* हिंदी बोलणे सराव करावा.

* हिंदी भाषेचा उपयोग करावा.

* संवाद कौशल्य वाढवावे.

* शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.

* शुद्धलेखनामध्ये प्रगती करावी.

* वर्तमानपत्राची नियमित वाचन करावे.

* लेखनातील चुका टाळाव्यात.

* स्वाध्याय पुस्तिका पूर्ण कराव्यात.

* विज्ञानाचे प्रयोग करून पाहावे.

* प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.

* गटकार्यात सहभाग वाढवावा.

* उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.

* संख्यांचे वाचन सराव करावा.

* नकाशा वाचन सराव करावा.

* परिपाठात सहभाग घ्यावा.

* भाषा विषयात प्रगती करावी.

* चित्रकलेचा छंद झोप असावा.

* त्याले उपक्रमात सहभाग घ्यावा.

* प्रश्नोत्तरे पाठ करावीत.

* कविता पाठ कराव्यात.

* संवाद कौशल्य वाढवावे.


    व्यक्तिमत्व गुणविशेष: 

* इतरांना मदत करतो.

* भेदभाव न करता सर्वांमध्ये मिसळतो.

* निस्वार्थपणे काम करतो.

* परिसर स्वच्छ ठेवतो.

* वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.

* शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.

* मोठ्यांचा आदर करतो.

* आपली मते ठामपणे मांडतो.

* मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.

* गृहपाठ आवडीने करतो.

* गटात काम करताना इतरांची मते जाणून घेतो.

* शाळेत येणे आनंद वाटतो.

* नवीन नवीन गोष्टी शिकून घेतो.

* कोणतेही काम एकाग्रतेने करतो.

* आत्मविश्वासाने काम करतो.

* शाळेच्या नियमांचे पालन करतो.

* कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.

* प्रश्न विचारताना घाबरत नाही.

* धाडसी वृत्ती दिसून येते.

* उपक्रमामध्ये कृतिशील सहभाग घेतो.

* इतरांपेक्षा वेगळा कल्पना/ विचार मांडतो.

* इतरांशी नम्रपणे वागतो.

* स्वतःची चूक मान्य करतो.


 "प्रगती पत्रक नोंदी: Pragati patrak nondi - Ram Govardhan Dole "

श्री राम गोवर्धन डोळे

शिक्षक