नवोदय परीक्षेला जाताना.....

 

    नवोदय परीक्षेला जाताना.....

"नवोदय परीक्षेला जाताना".....
"नवोदय परीक्षेला जाताना".....
नवोदय परीक्षेला जाताना आपण काय काय सोबत घ्यावे , पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी ते आज आपण पाहणार आहोत..

घरून लवकर निघा ,सावकाश जा ,वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचा.

* साडेदहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचा.

* नवोदय परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट दोन प्रतित सोबत घेऊन जा.

* परीक्षेला जाताना उत्तर पृष्ठावर लिहिण्याकरता केवळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचाच वापर करा, त्यासाठी तीन पेन सोबत घेऊन जा.

* परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करण्यास सक्त मनाई असते.

* सोबत एक पॅड घेऊन जा.

* तुमच्यासोबत एक हात रुमाल घेऊन जा, कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो, तो घाम साफ करण्यासाठी.

* पाण्याची एक बॉटल सोबत घेऊन जा.

* कच्चे काम प्रश्नपत्रिका वर करा, कच्च्या कामासाठी जी जागा आहे त्यावरच करा. 

* पेपर सोडविताना तुम्हाला पूर्ण दोन तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडू नका वेळेचे नियोजन करा.

* तुम्हाला प्रत्येक खंडात स्वतंत्रपणे क्वालिफाय व्हावे लागेल, त्यासाठी प्रत्येक खंडाची उत्तरे द्यावी लागतील.

             'नवोदय परीक्षेला जाताना'.....

* पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा.

* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न सोडवताना सूचना काळजीपूर्वक वाचा.

* मानसिक क्षमता परीक्षण यावरील प्रश्न दहा प्रकार तुम्हाला येतात, पण अति आत्मविश्वास करू नका, प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा गडबडीत उत्तरे निवडू नका.

* चाळीस आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे टार्गेट ठेवा.

* अंकगणित वरील प्रश्न सोडविताना प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर अंदाजे करू नका ,कितीही सोपा प्रश्न असला तरी तो सोडवाच.

*कधी कधी सुरुवातीला पाच ते सहा प्रश्न खूपच सोपे येतात आणि मग आपण रिलॅक्स होतो, उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच आपण खऱ्या चुका करतो हे लक्षात ठेवा.

* नवोदयचे खरे मेरिट हे गणितावरच आधारित असते ,त्यामुळे गणितावर जास्त फोकस करा.

* महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा, जिल्ह्यात जवळपास आठ ते नऊ हजार विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसतात आणि त्यातील फक्त 80 विद्यार्थी नवोदय परीक्षेला सिलेक्ट होतात.

* भाषा परीक्षण म्हणजेच उताऱ्यावरील प्रश्न सोडविणे अगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या, त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरुवात करा ,उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उत्तराशी जुळणारे आहे का याची खात्री करा.

* उतारावरील वीस ची वीस प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने टार्गेट ठेवा.

* शेवटी एकच सांगतो तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80  प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या सर्वोच्च शिखरावर व्यवस्थित गुंफण करा, आणि नवोदयचे तुमचे स्थान निश्चित करा. यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 💐

"नवोदय परीक्षेला जाताना".....

     परीक्षेला जाता जाता पुढील लिंक वर क्लिक करून नवोदय संदर्भाचे सर्व व्हिडिओ पहा...  https://www.youtube.com/@ramgovardhandole8936

     श्री राम गोवर्धन डोळे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा