माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार.... कारण वाचा
ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2023 मध्ये पहिली ला जाणार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती...
आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे खूप महाग होत चाललेले आहे असे म्हणतात की, आजचे शिक्षण हे गरिबांचं नाही.... पण जर आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत टाकली तर ते नक्कीच 100% यशस्वी होतील.
नमस्कार पालकांनो
आपला मुलगा जर 2023 मध्ये इयत्ता पहिली ला जाणार असेल तर तुम्ही त्यास जर इंग्रजी माध्यमाला घातले तर तुम्हाला कमीत कमी फी मुंबई ,पुण्याला तर 30हजार ते 1लाखाच्या आसपास असेल. ग्रामीण भागामध्ये पण इंग्रजी माध्यम फी जवळपास 20हजार ते 50हजार च्या आसपास आहे.... असेच जर तुम्ही नोकरी लागेपर्यंत ती भरत गेलात तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा की तुमची फी किती जाते....
एवढी फी भरून सुद्धा नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही आहे सध्याच्या काळात...
जर मी माझा मुलगा इंग्रजी माध्यमाला न घालता जिल्हा परिषद शाळेत घातला आणि त्याला जी फी भरायची आहे ती फी मी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवली उदा. रिलायन्स ,टाटा, मारुती सुझुकी, बजाज, इन्फोसिस, विप्रो ,एच एफ डी सी बँक... यासारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे जर शेअर्स मी खरेदी केले तर ...
'माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार '. कारण वाचा
समजा त्याला पहिलीला पन्नास हजार भरायचे आहेत. ते पन्नास हजार मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,दुसरीला जी 60000 भरायचे ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,तिसरीला 70 हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,चौथीला ८० हजार भरायचे आहेत ते मी शेअर मार्केटमध्ये टाकणार ,असं करत करत त्याचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत ,पंधरा ते सोळा वर्षे पैसे शेअर मार्केटमध्ये असणार आणि त्याची किंमत आता पहिल्या पन्नास हजाराची जवळपास तीस ते चाळीस लाख झाले असणार... असे सर्व जवळपास त्याचे शिक्षण होईपर्यंत अंदाजे आठ ते नऊ कोटी रुपये मिळतील.
आणि जर जिल्हा परिषद मध्ये घातले तर मुलगा कर्तत्ववान असेल तर तो स्वतःची प्रगती करेलच कारण इंग्रजीमध्ये फी भरून कर्तत्ववान होईल याची खात्री देणारी एकही इंग्रजी शाळा आज उपलब्ध नाही.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असा तयार होतो. आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही उत्कृष्ट शिक्षण देत आहेत..
म्हणूनच मी माझा मुलगाही जिल्हा परिषद शाळेत घालणार आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणार आहे.
जर तुम्ही तुमचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत घातला तर जिल्हा परिषद शाळा ही वाचतील ,मातृभाषेतून शिक्षणही मिळेल आणि एका वडिलांची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल..
मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही उलट तोच इतरांना रोजगार देऊ शकेल.
बघा विचार करा आणि पटलं तर इतरांना शेअर करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा