विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांच्या भरती बाबत...
आज कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यांना विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) व केंद्रप्रमुख यांच्या पदांच्या भरती बाबत, मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आलेला आहे..
![]() |
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत.. |
प्रति,
विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त कार्यालये ( सर्व)
विषय: विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत...
संदर्भ : शासनाचे समक क्रमांकाचे दिनांक 05.05.2022 चे पत्र
उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.
शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील विस्ताराधिकारी( शिक्षण )व केंद्रप्रमुख हि पदे महत्वाची असून राज्यांमध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
या विभागाच्या दि.10.06.2014 च्या आधी सूचनेतील तरतुदीनुसार आपल्या अधिपत्याखालील विस्तार अधिकारी( शिक्षण) या पदावरील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदरची पदे भरण्याबाबत संदर्भातील पत्रान्वे निर्देश दिलेले होते .तथापि, प्रस्तुत प्रकरणी केलेल्या कार्यवाही बाबत शासनास काहीच अवगत करण्यात आलेले नाही .
तरी उक्त नमूद दिनांक 10.06.2014 च्या आधी सूचनेनुसार विस्तार अधिकारी( शिक्षण) (श्रेणी -2 )व विस्तार अधिकारी (शिक्षण) ( श्रेणी -3) संवर्गातील तालुका निहाय मंजूर पदे ,कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील est14-rdd@mah.gov.in या ईमेलवर दिनांक 10.04.2023पर्यंत पाठविण्यात यावा ही विनंती.
कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा