राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.

सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की 4% महागाई भत्त्याचा शासन निर्णय आला आहे.

   आज 30 जून 2023 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय आला आहे..

     राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

    शासन असे आदेश देत आहे की,1 जानेवारी 2023 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 38 टक्क्यावरून 42 टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतना सोबत रोखीने देण्यात यावी.

'राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत.'

       महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे लागू राहील.

     यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखाक्षर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

     सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202306301832142205असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
  "राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ बाबत".



दहावी निकाल तारीख 2023

 दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

दहावी निकाल तारीख 2023

मागिल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 02 जून  रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

              राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल 02 जून ला जाहीर होणार आहे. यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC ला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार.

    (10th ssc result 2023 date) असल्याची माहिती मिळाली आहे.


रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.

 रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.

रयत शिक्षण संस्थेमध्ये भरती निघालेली आहे, यामध्ये 780 जागांसाठी भरती होणार आहे ,लगेच अर्ज करा. 

अर्ज सुरू होण्याची  तारीख -17/05/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख -22/05/2023

एकूण जागा- 780


पद आणि पदसंख्या

पद                           पदसंख्या

सहाय्यक प्राध्यापक       780

नोकरीचे ठिकाण - पुणे

ऑनलाइन अर्ज शुल्क रु.200 (दोनशे रु.) प्रति अर्ज जे परत न करणे  योग्य आहे.

      'रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.'

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी खालील कागदपत्रे सादर करावे

1) ऑनलाइन अर्जाची प्रिंट प्रत

2) गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र च्या सर्व साक्षांकित प्रती

3) मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित प्रती जमा करावेत.


       "  रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti."

तिसरी ,पाचवी ,आठवी , दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

    महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात .

         शाळेत प्रवेश घेतलेल्या पैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इयत्ता पाचवी नंतर आणि विशेषत: आठवी नंतर शाळा सोडतात ,हे एका सर्वेक्षण स्पष्ट झाले आहे .NNSO ने 2017- 18 मध्ये केलेल्या 75 व्या फेरीतील घरगुती सर्वेक्षणानुसार 6 ते 17 वयोगटातील शाळा बाह्य मुलांची संख्या जवळपास तीन कोटी बावीस लाखापर्यंत होती.

        या मुलांना शैक्षणिक व्यवस्थेत सामील करून घेण्याची आणि 2030 पर्यंत शाळाबाह्य  मुलांचे प्रमाण कमी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली, ज्याचे उद्दिष्ट शाळा पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत शंभर टक्के शाळा उपस्थितीचे प्रमाण आहे .देशातील सर्व मुलांना प्री स्कूल ते बारावीपर्यंत व्यवसायिक शिक्षणासह दर्जेदार सर्वसमावेशक शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश आणि संधी मिळतील याची हमी देण्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय प्रयत्न केले जातील याबाबत दोन प्रकरणांना प्राधान्य दिले जाईल.

          त्याचप्रमाणे तिसरी, पाचवी आणि आठवी तसेच दहावी आणि बारावी इयत्तेतील मुले एकही न चुकता परीक्षा देऊ शकतील. शाळेचा दिवस विविध कारणामुळे शाळेत जाऊ नये शकणाऱ्या मुलांना मोफत आणि दुरुस्त शिक्षणाचा लाभ मिळेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या विषयाला प्राधान्य देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे.

          

    'इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात .'

        "खुले आणि रिमोट "असलेल्या शाळाबाह्य मुलांसाठी पर्याय

शाळेत जाण्यास असमर्थ असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल अँड स्टेट ओपन स्कूल एक मुक्त आणि दुरुस्त शिक्षण कार्यक्रम राबवेल.

       औपचारिक शालेय प्रणालीच्या ग्रेड तीन ,पाच आणि आठच्या समतुल्य माध्यमिक शिक्षण कार्यक्रम तसेच इयत्ता दहावी ,बारावी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासारखे माध्यमिक शिक्षणा अभ्यासक्रम तसेच प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्धी कार्यक्रम, लागू केले जातील. नवीन राज्य मुक्त शाळा संस्था स्थापन करून आणि विद्यमान संस्था वाढवून प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषांमध्ये त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

              

         "इयत्ता दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी 17 नंबर डायल करून थेट परीक्षा देऊ शकतात ."


जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

 जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

          महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय ,अधिसूचना, परिपत्रक इत्यादी द्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अहर्ता नमूद केलेली आहे.

जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.

    सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक 3 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे )दोन वर्षे इतकी शितलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 25 वर्षे )विचारात घेण्यात यावी.

      तसेच विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदासाठी देखील दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत विहित कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतके शिथिलता देय राहील.

      त्याचबरोबर ग्राम विकास विभाग , शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 नुसार मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेले /भरलेले आहेत, अशा उमेदवारांचे वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेत बसण्याचा अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये.  

     

      'जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada.'

     पुढील GR पहा:

 

           राज्य शासनाच्या 43 विभागाअंतर्गत तब्बल पावणेतीन लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यात 75 हजार पदांची मेगा भरती केली जाणार आहे .भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आराखडा शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे.

      जिल्हा परिषदेतील गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय जीआर जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे. 

1) आरोग्य पर्यवेक्षक

2) आरोग्य सेवक (पुरुष)

3) आरोग्य सेवक (महिला)

4) औषध निर्माण अधिकारी 

5)कंत्राटी ग्रामसेवक 

6)कनिष्ठ अभियंता

7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी )

8) कनिष्ठ अभियंता( विद्युत )

9) कनिष्ठ आरेखक 

10) कनिष्ठ लेखा अधिकारी

11) माध्यम कनिष्ठ यांत्रिकी 

12) कनिष्ठ लेखाधिकारी 

13) कनिष्ठ सहाय्यक लिपीक 

14) कनिष्ठ सहाय्यक लेखा 

15) जोडारी

16) तारतंत्री

17) पर्यवेक्षिका

18) पशुधन पर्यवेक्षक 

19) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

20) यांत्रिकी

21) रिगमन 

22) लघुटंकलेखक

23) लघुलेखक (उच्च श्रेणी) 

24) लघुलेखक (निम्न श्रेणी) 

25) वरिष्ठ सहाय्यक लिपिक

26) माध्यम विस्ताराधिकारी (कृषी)

27) लघुलेखक  उच्च श्रेणी

28) वरिष्ठ सहाय्यक लेखा 

29) विस्तार अधिकारी( पंचायत )

30) विस्ताराधिकारी (शिक्षण)

31) विस्ताराधिकारी (सांख्यिकी)

 वरील पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे ,अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा. त्यामध्ये सर्व अभ्यासक्रमम सविस्तरपणे दिलेला आहे.

        " जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर : Jilla Parishad bharti sathi vayomaryada."

महावितरण मध्ये भरती Mahavitaran Madhye Bharti 2023

 Mahavitaran Madhye Bharti 2023 

महावितरण मध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे...

Mahavitaran Madhye Bharti 2023

महावितरण मध्ये भरती Mahavitaran Madhye Bharti 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख- ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17/05/2023

एकूण जागा - 320


           पद                             पदसंख्या

      1) लाईनमन.                     291

      2)कॉम्प्युटर ऑपरेटर.          29

अटी व शर्ती

1)  वयोमर्यादा- 

18 वर्षे ते 30 वर्षे (मागासवर्गीयासाठी 5 वर्षे शिथिल क्षम)

2) उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.

3) कामाचे ठिकाण - अहमदनगर जिल्ह्यात कोठेही वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55 टक्के व मागासवर्गीयांसाठी 50 टक्के गुण आवश्यक. 'Mahavitaran Madhye Bharti 2023'

4) शैक्षणिक पात्रता-  दहावी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा आयटीआय.

5) कागदपत्र जमा करणे पूर्वी अर्जदाराने शासनाच्या www.appreceshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक.

6) उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र ,आयटीआय, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके जातीचे प्रमाणपत्र( लागू असल्यास ),आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक 16/ 5/ 2023 ते 17/ 5 /2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत या वेळेत आणावीत अपूर्ण कागदपत्रे माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

7) प्रशिक्षण संपल्यानंतर शिकवू उमेदवारांना कंपनीचे सेवेत घेणे बंधनकारक नाही. ''Mahavitaran Madhye Bharti 2023''

8) जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीचे काही भागांमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्णता जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे.

9) अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य 

पत्ता -अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि.कंपनी मर्यादित मंडळ, कार्यालय विद्युत भवन ,स्टेशन रोड ,अहमदनगर 414001


आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

 आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

सरळ सेवेने परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक - ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 2023

आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023

महाराष्ट्र राज्यातील शासकीय ,वैद्यकीय ,दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ' क 'संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

       राज्यातील एकूण 4751 पदांपैकी तब्बल 4000 पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या 25 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन्यायालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

        'आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023'

         वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अं seतर्गत येणारी गट क परिचार्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

      रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक-

1) ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक- 10 मे 2023

2) ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक- 25 मे 2023

3) ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक- 10 मे 25 मे 2023

4)सामायिक परीक्षेकरिता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक-www. med -edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.

5) सामायिक परीक्षेचा दिनांक - www. med -edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.

वेतन श्रेणी 

सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व अधिनियमानुसार अनुज्ञेय भत्ते.


अधिपरिचारिकांची पदे - 3974

यामध्ये खुला -1954

अनुसूचित जमाती-321

अनुसूचित जाती-338

इतर- 1361

विविध पदे - 

प्रयोगशाळा सहाय्यक- 170

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 112

ग्रंथपाल -12

स्वच्छता निरीक्षक -9

इसीजी तंत्रज्ञ- 36

आहार तज्ञ- 18

औषध निर्माता- 169

ग्रंथसूचीकार -19

ग्रंथालय सहाय्यक -16

समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय)- 86

दूरध्वनी चालक -17

अंधारखोली सहाय्यक -10

किरण सहाय्यक 23

सांख्यिकी सहाय्यक 3

शिंपी 15

वाहनचालक 34

गृहपाल 16

व्यवसाय उपचार तज्ञ 7

अशा विविध पदांची जाहिरात संचालन्यायालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.med-edu.in/

     

    "आरोग्य विभागात मोठी भरती 2023 : arogya vibhagat mothi bharati 2023"