मराठी वाक्प्रचार आणि अर्थ : Marathi vakyaprachar ani arth
मराठी वाक्प्रचारांचा वापर केल्यामुळे भाषेला गोडी प्राप्त होते.
वाक्प्रचार हा शब्दशः असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो.
वाक्प्रचार आणि अर्थ यावर आधारित पुढील व्हिडिओ पहा:
अकलेचा कांदा -मूर्ख मनुष्य
अर्धचंद्र- हकालपट्टी करणे
अटकेवर झेंडा लावणे -मोठा पराक्रम गाजविणे
अंगाचा तीळ पापड होणे - खूप राग येणे
अळम टळम करणे - टाळा टाळ करणे
अठरा विश्व दारिद्र्य असणे- अतिशय गरीब असणे
अठरा गुणांचा खंडोबा- लबाड माणूस
अत्तराचे दिवे लावणे - पैशाची उधळपट्टी करणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे- थोडेशा यशाने हुरलूण जाणे
अन्नाला मोताल होणे - उपाशी राहणे
अवदसा आठवने - वाईट बुद्धी सूचने
अक्काबाईचा फेरा येणे - अत्यंत गरिबी येणे
अंग धरणे - बाळसेदार होणे, लठ्ठ होणे
आभाळ ठेंगणे होणे- खूप आनंद होणे
आकाशाला गवसणी घालने - बाहेरची गोष्ट करू पाहणे
आगीत तेल ओतणे -एखाद्या अपकृत्य घडत असताना त्यात भर ट
आतड्याला पिल पडणे- काळजाला फादर फुटणे
आकाश पाताळ एक करणे -खूप प्रयत्न करणे खूप आरडाओरडा करणे
आगीतून निघून फुपाट्यात पडणे- एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे
आभाळ कोसळणे -खूप मोठे संकट येणे
इतिष्री होणे -शेवट होणे
इरेला होणे-चुरस वाढणे
उपसर्ग होणे- त्रास होणे
उखळ पांढरे होणे -खूप पैसा मिळणे
उचल बांगडी करणे -हाकलून देणे
उन्हाच्या झळा सोसणे- दुःख सहन होणे
उपरती होणे -पश्चाताप होणे
उदक सोडणे- त्यागा करणे
उलटी अंबारी हाती येणे- भीग मागण्याची वेळ येणे
उदरीशनी येणे -भरभराट होणे
उष्ट्या हाताने कावळ्याने हाकलेक -कधीही कोणाला मदत न करणे
उर फोडून येणे -फार श्रम करणे
उर भरून येणे-अंत: करणात भावना दाटून येणे
उंटावरून शेळ्या हाकणे -स्वतः काही न काम करता दुसऱ्याला केवळ उपदेश करणे
कच खाणे - माघार घेणे
कपाळ मोक्ष होणे - मरण पावणे
कंठस्नान घालने - ठार मारणे
कणिक तिंबने - भरपूर मार देणे
कढी पातळ होने - आजारामुळेअंगात त्रान न उरणे
कपाळ पांढरे होणे - वैधव्य प्राप्त होणे
कपाळ फुटणे-वैधव्य प्राप्त होणे
कान फुंकणे-एखाद्याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या मनात भरविणे
कानावर हात ठेवणे -आहे त्यावेळी जबाबदारी टाळणे
काका दृष्टीने पाहणे -बारकाईने न्याहाळने
कानाने हलका असणे -कशावरही पटकन विश्वास ठेवणे
कानाला खडा लावणे -एखादी चूक पुन्हा न करण्याचे ठरविणे
काथ्यकोट करणे -निरर्थक वादविवाद करणे
काट्याचा नायटा होणे -शिल्लक कारणावरून मोठे संकट ओढणे
काट्याने काटा काढणे -दुष्टाचा दृष्ट्याकडून नष्ट करणे
काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे
कानोसा घेणे- अंदाज घेणे
काखा वर करणे -जवळ काही नाही असे दाखवणे ,ऐनवेळी बाजूला होणे
कोंड्याचा मांडा करणे- समाधानाने व काटकर सरीने राहणे
कागदी घोडे नाचविणे- फक्त लेखनात शूरपणा दाखवणे
काडी मोड करणे-घटस्फोट घेणे, संबंध तोडणे
कुंभाड रचने- दुसऱ्यावर खोटे आरोप करणे
कुंपणाने शेत खाणे -विश्वासू माणसाने घात करणे
कच्ची लागणे- एखाद्याच्या नादी लागणे
कुत्रा हालखाने- अतिशय वाईट स्थिती येणे
केसाने गळा कापणे -विश्वासघात करणे
खलबत्त करणे-चर्चा करणे
खसखस पिकणे -मोठ्याने हसणे
खडा टाकाने-अंदाज घेणे
खडे फोडणे- दोष देणे
खोगीर भरती करणे -पराभूत करणे
खाजवून खरुज काढणे -मिटलेले भांडण मुद्दाम उकरून काढणे
खाल्ल्या घराचे वासे मोजणे- केलेले उपकार विसरणे
खाल्ल्या अन्नास जागणे- उपकाराची जाणीव ठेवणे
गंगेत घोडे नहाने- एकदा काम कसेबसे पार पाडणे
गर्भ गलीत होणे- खूप घाबरने
गंडा तर येणे -संकट येणे
ग्रहण सुटणे -संकटातून सुटका होणे
गगळ्याला तात लागणे -मोठ्या संकटात पडणे
गळ्यातील ताईत होणे- अतिशय प्रिय होणे
ग ची बाधा होणे- गर्व होणे घमेंड होणे
गाशा गुंडाळणे-निघून जाणे
गळ्यात घोरपड बांधणे- फक्त जबाबदारी लादणे
घोडे पेंडखाने -अडचण निर्माण होणे
घोडे मारणे -नुकसान करणे
घर डोक्यावर घेणे -खूप आरडाओरडा करणे
घरावर तुळशी पत्र ठेवणे- घरादाराची अशा सोडणे
घागरगडाचा सुभेदार -पाणी भरण्याच काम करणारा
धूळ चारणे- प्रभाव करणे
चार हात होणे -लग्न होणे
वळणे- कंटाळवाणे बडबड करणे
चह करणे-स्तुती करणे वाह वाह करणे
चुलीला अक्षता देणे- चुलबंद आमंत्रण देणे
चौदावे रत्न दाखविणे- खूप मार देणे
छक्के पंजे करणे- लबाडी करणे
छातीचा कोट करणे -धैर्याने तोंड देणे
जिभेस हाड नसणे- वाटेल ते बोलणे
जीव भांडत पडणे -काळजी दूर होणे
जीव मेटा कुटीस येणे- फार त्रास होणे
जीव कानात गोळा- होणे खूप उत्सुकतेने ऐकणे
जीव टांगणीस- लागणे चिंता वाटणे
जीव मुठीत धरणे- मन घट्ट करणे
झाकले माणिक- प्रसिद्धी न आलेली पण अत्यंत गुणी व्यक्ती
टेंभा मिरविणे- दिमाग दाखवने
डोके खर्च करणे -विचार करणे
डांगोरा फिटने- सगळ्यांना सांगत सुटणे
डोळे झाक करणे -लक्षणे देणे
डोळ्यात धुळ फेकणे -क्षणाधार्थ फसवने
डोळ्यात तेल घालने - खूप लक्ष देणे
डोळे निवणे- पाहून तृप्त होणे
डोळ्यात अंजन घालने -चूक लक्षात आणून देणे
डोळे पांढरे होणे -अतिशय घाबरणे
डोक्यावर मिरे वाटणे- वर चढणे
डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसाला दोष देणे
डोळ्यावर कातडे ओढणे- जाणून बुजून दुर्लक्ष करणे
डोळ्यात प्राण आणणे -खूप आतुर होणे
डोळ्यांचे पारणे फिटणे- पाहून समाधान होणे
डोळ्यातील काजळ चोरणे- खूप कौशल्याने चोरी करणे
डोंगर कोसळणे- अतिशय दुःख होणे
तारे तोडणे- मूर्खपणाची बडबड
तुंतूने वाजविणे- एखादी शिल्लक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे
तेरड्याचे फुल- चंचल स्वभावाची व्यक्ती
तळहातावर शीर घेणे -जीवावर उदार होणे
तळहाताचा फोड -अतिशय काळजीने केलेली जपून
तडीस नेणे -एखाद्या काम पूर्ण करणे
ताकाश तूर लागून देणे -कोणतेही गोष्टीचा थांग पत्ता लागून देणे
तोंड पाटील की करणे- रिकामी बडबड करणे
तोंडाला पाणी पुसणे -फसवणे
तोंडात तीळ न भिजणे -कोणत्याही गुप्त गोष्टी प्रकट करणे
तिलांजली देणे- हक्क सोडणे
तोंडाला कुलूप लावणे- गप्प बसणे
तोंड पूजा करणे -निरर्थक स्तुती करणे
तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे
तांडव नृत्य करणे-थयथयात करणे
तुमची झेलणे- हाजी हाजी करणे
थंडा फराळ करणे- उपाशी राहणे
दाती तृण धरणे -शरण येणे
दाढी धरणे -आळवणी करणे
द्राविडी प्राणायाम करणे -सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
द्रौपदीची थाळी- नेहमी गरज भागवणारी व्यक्ती
दातांच्या कन्या करणे -वारंवार विनंती करणे
दातास दात लावून बसणे -उपाशी राहणे
दुःख वेशीवर टांगणे- संकटे लोकांपुढे मांडणे
दुखावर डांग्या देणे -दुखी माणसाला टोचून बोलणे
दात कोरून पोट भरणे-भलतीच काटकसर करणे
धर्मावर सोमवार सोडणे -एखादे काम दुसऱ्याकडून करून आपण मोठेपणा मिळवणे
धाबे दनाने- अतिशय घाबरणे
नकरास रूप घालणे -खोटे दुःख दाखवणे
नमनालाच घडाभर तेल जाळणे- सुरुवात करण्यास विलंब करणे
नाकाने कांदे सोडणे- जादा शहाणपणा दाखवणे
नाकाला मिरच्या झोबंणे - खूप राग येणे
नाकातला बाल -अतिशय प्रिय व्यक्ती
नांगी टाकने- हातपाय गाळणे ,पडते घेणे
नाकमुठित धरणे - शरण जाणे
न भूतो न भविष्यती होणे -पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे
पराचा कावळा करणे- अतिशयोक्ती करणे
पाण्यावरची रेघ - क्षणभंगुरता
पाणी पडणे - व्यर्थ होणे ,फुकट जाणे
पाणी पाजणे- पराभव करणे
पाचवीला पुजणे - एखादी गोष्ट नेहमीच करावी लागणे
पाचावर धारण बसणे- खूप भयभीत होणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पोटाची दामटी वळणे -खूप भूक लागणे ,खायला न मिळणे
पान उतारा करणे- अपमान करणे
पालथ्या घागरीवर पाणी - निष्फळ श्रम
पोबारा करणे - पळून जाणे
'मराठी वाक्प्रचार आणि अर्थ : Marathi vakyaprachar ani arth'
पाठीचे धिरडे करणे- खूप मारणे
पांघरून घालने- चूक झाकणे
पाठ चोरणे - कुचरपणा करणे
पित्त उसळणे/ खवळणे - संताप होणे ,खूप राग येने
पदराला गाठ मारणे- कामाचा अनुभव घेऊन सुधारणा करणे
फुटका डोळा काजळाने साजरा करणे - काही युक्तीनी अवगुण झाकणे
बत्तीशी रंगविणे - थोबाडीत मारणे
बार उडविणे -कार्य पूर्ण करणे
बाळकडू मिळणे- लहानपणापासून शिकवण मिळणे
बभ्रा करणे - बोभाटा करणे
बांगडी फुटणे - विधवा होणे
बेला फुलाला गाठ पडणे - सहजासहजी योग जमून येणे
बोचनी लागणे - मनास लागून राहणे
बोल लावणे- दोष देणे
बिब्बा घालणे - अडथळा आणणे, काम बिघडविणे
ब्रह्मांड आठवणे- भीती वाटणे, खूप दुःख होणे
भिजत घोंगडे - रेंगाळलेले काम
भिकेचे डोहाळे लागणे - दरिद्रीपणाने वागणे
मनात मांडे खाणे -व्यर्थ मनोराज्य करणे
मधून विस्तव न जाणे- अतिशय वैर अस
मेतकूट जमणे- घनिष्ठ मैत्री होणे
माशी शिंकणे- कामात अडचण येणे
मात्र चालणे - योग्य परिणाम होणे, इलाज चालणे
मान तुकविणे -शरण जाणे
मिशीवर ताव मारणे - फुशारकी मारणे
मिशाना तूप लावणे- उगीच ऐट करणे
मुग गिळून बसणे - मुकाट्याने गप्प बसणे
मांडीवर घेणे - दत्तक घेणे
मधाचे बोट लावणे - खोटी आशा लावने
योगक्षेम चालविणे - उदरनिर्वाचि तजवीज करणे
राम राम ठोकणे - कायमचा निरोप घेणे
राम म्हणणे - मरणे
राशीस बसणे - छळणे ,सतावणे
रेवडी उडविणे- फजिती करने
लाखोली वाहणे - शिव्या देणे
वाकडे पाऊल पडणे - दूरवर्तन घडणे
वाऱ्याची मोट बांधणे - अशक्य गोष्ट करू पाहणे
वैकुंठ वासी होणे- मरण पावणे
विडा उचलणे -प्रतिज्ञा करणे
वड्याचे तेल वांग्यावर काढणे- एकाचा राग दुसऱ्यावर काढणे
वडाची साल पिंपळाला लावणे - चुकीचा संबंध जोडणे
वाटण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे
वेड पांघरून पेडगावी जाणे -एखादी गोष्ट समजून सुद्धा न समजल्याचे ढोंग करणे
विरजण घालणे - निरुत्साही करणे
शाल जोडीतून देणे- शब्द प्रहार करणे
शास्त्रार्थ करणे - योग्य अयोग्य काय याचा विचार करणे
शुचिर्भूत होणे -शुद्ध होणे
शेणाचे दिवे लावणे- दिवाळे निघणे, कर्जबाजारी होणे
शेण सडा होणे - परिस्थिती वाईट होणे
ससेमिरा लावणे - तगादा लावणे
संक्रात गुदरने - संकट येणे
सळो की पळो करून सोडणे- अतिशय त्रास देणे
साखरेची साल काढणे - अतिशय सूक्ष्म छाननी करणे
सुतोवाच करणे - प्रारंभ करणे
सुंठे वाचून खोकला जाणे - उपाय न करताही संकट टळणे
सोक्षमोक्ष करणे - शेवट करणे
सांगावा फोडणे - बिंग फोडणे
हळद लागणे - विवाह होणे
हतबल होणे - असमर्थ ठरणे
हुलकावणी देणे - चकवणे
हात टेकणे - पराभव मान्य करणे
हात ओला होणे- फायदा होणे, पैसा मिळणे
हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे
हातावर शीर घेणे - प्राणाची ही परवाना करणे
हातावर तुरी देणे - फसवून पळून जाणे
हाता तोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खाण्यास मिळणे
हाडाची काडे करणे - खूप कष्ट करणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा