समूहदर्शक शब्द : samuhadarshak shabd
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समूहदर्शक शब्द यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
एकापेक्षा अधिक वस्तू व्यक्ती प्राणी यांच्या समूहाला दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात.
ससमूहदर्शक शब्दांची व्हिडिओ लिंक पुढे आहे.
* आंब्याच्या झाडांची- राई
* विकत घातलेले आंब्यांची - अढी
* गुरांचा - कळप
* हत्तींचा - कळप
* हरिणांचा - कळप
* मेंढ्यांचा - कळप
* शेळ्यांचा- कळप
* प्रश्नपत्रिकांचा - संच
* पाठ्यपुस्तकांचा - संच
* उपकरणांचा - संच
* संगणकांचा - संच
* वस्तूंचा - संच
* पुस्तकांचा - गठ्ठा
* वह्यांचा - गठ्ठा
* रुपयांची - चवड
* भाकरींची - चवड
* उसांची - मोळी
* लाकडांची - मोळी
* चोरांची- टोळी
* दरोडेखोरांची - टोळी
* उंटांचा - तांडा
* लमाणांचा - तांडा
* काजूंची - गाथण
* माशांची - गाथण
* विटांचा - ढीग
* कलिंगडांचा - ढीग
'समूहदर्शक शब्द : samuhadarshak shabd '
* प्रवाशांची - झुंबड
* उतारूंची - झुंबड
* पोत्यांची - थप्पी
* नोटांची - थप्पी
* नोटांचे - पुडके
* विमानांचा - ताफा
* राजकीय व्यक्तींच्या गाड्यांचा - ताफा
* नारळाची - पेंड
* करवंदांची - जाळी
* किल्ल्यांचा - जुडगा
* भक्तांची - मांदियाळी
* किल्ल्यांचा - जुडगा
* केसांचा - झुबका
* केसांची - बट
* गवतांचा - भारा
* गवताची - गंजी
* जहाजांचा - काफीला
* द्राक्षांचा घड किंवा घोस
* फुलांचा - गुच्छ
* खेळाडूंचा - संघ
* पक्षांचा - थवा
* माणसांचा - जमाव, गर्दी
* मुलांचा - घोळका
* साधूंचा - जथा
* फुलझाडांचा - ताटवा
* केळ्यांचा - घड,लोंगर
* बांबूंचे - बेट
* मुंग्यांची - रांग
* तारकांचा - पुंज
* मडक्यांची - उतरंड
* दुर्वांची - जुडी
* पालेभाज्यांची - गड्डी
* वेलींचा - कुंज
* वाद्यांचा - वृंद
* विद्यार्थ्यांचा - गट
* वर्गांची - तुकडी
* सैनिकांचे - पथक, तुकडी, पलटण
* महिलांचे - मंडळ
* यात्रेकरूंची - जत्रा
* धान्याची - रास
* बालवीरांचे - पथक
* वारकऱ्यांची - दिंडी
* केवड्याचे - बन
* नाण्यांची - चळत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा