Sankhyahe Prakar

 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी......

✍️  नैसर्गिक संख्या   (मोज संख्या, प्राकृतिक संख्या)

1,2,3,4,... या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात.

*नैसर्गिक संख्या अनंत आहेत.

* सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.

*सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.

*शून्य ही नैसर्गिक संख्या नाही.

*सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत.

✍️ पूर्ण संख्या 

शून्य व सर्व नैसर्गिक संख्या  मिळून पूर्ण संख्या संच तयार होतो.

*सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात.

*सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे.

*सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही.

*पूर्ण संख्या अनंत आहेत.

✍️ पूर्णांक संख्या :

धनसंख्या ,ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात.

*शून्य हा या संख्यामध्ये मध्यवर्ती बिंदू आहे.

*उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे लहान होत जातात.

*सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे.

*सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या (-1 )आहे.

*शून्य हा धन पूर्णांक ही नसतो व ऋणपूर्णांकही नसतो.

✍️ विरुद्ध संख्या: ( बेरीज व्यस्त संख्या)

N ही जर एक नैसर्गिक संख्या असेल तर  (-N)ही त्या संख्येची विरुद्ध संख्या असते.

*ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकांच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या म्हणतात.

* 1ची विरुद्ध संख्या (-1)

* (-2) ची विरुद्ध संख्या 2

* 0 विरुद्ध संख्या 0

✍️ समसंख्या :

ज्या संख्येला दोन ने पूर्ण(नि :शेष) भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात.

*समसंख्येचे एकक स्थानी 0,2,4,6,8यापैकी एखादा अंक असतो.

*सर्वात लहान समसंख्या दोन आहे.

*एक अंकी सर्वात मोठी समसंख्या 8 आहे.

*0 ही संख्या सम नाही.

*एक ते शंभर मध्ये 50 समसंख्या आहेत.

*दोन अंकी संख्या पैकी 45 सम संख्या आहेत.

✍️ विषम संख्या :

ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात.

*ज्या संख्येला दोन ने भागले असता बाकी एक उरते ती विषम संख्या असते.

*विषम संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 यापैकी अंक असतो.

*एक ते शंभर पर्यंतच्या संख्येमध्ये 50 विषम संख्या आहेत.

*दोन अंकी संख्या पैकी 45 विषम संख्या आहेत.

* 1 ही संख्या सम संख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही.

✍️ मूळ संख्या : (अविभाज्य संख्या)

ज्या संख्येचे  1 व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

* 2,3,5,7,11,13,17,......या मूळ संख्या आहेत.

*सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

*सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 ही आहे.

*सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या 11 ही आहे.

*सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 आहे.

*सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या 97 आहे.

*एकमेव सम मूळ संख्या 2 ही आहे.

*1 ते 100मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत.

* 1 ते 50 पर्यंत एकूण 15मूळ संख्या आहेत.

*मूळ संख्या अनंत आहेत.

* 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे.

*एक ही मूळ संख्या नाही.

*1ते 10 =2,3,5,7

*11 ते 20 =11,13,17,19

*21 ते 30=23,29

*31ते 40= 31,37

*41ते 50=41,43,47

*51 ते 60=53,59

*61 ते 70=61,67

*71 ते 80=71,73,79

*81ते 90=83,89

*91ते 100=97

*101 पासून 200 पर्यंतच्या मूळ संख्या (एकूण 21 आहेत.)

*101 ,103 ,107 ,109 ,113 ,127 ,131, 137 ,139 ,149, 151, 157, 163 ,167 ,173, 179 ,181 ,191,193,197, 199 या आहेत.

✍️ जोडमूळ संख्या:

ज्या दोन मूळ संख्यात केवळ दोनचाच फरक असतो अशा संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात.

* 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत.

(3-5),(5-7) ,(11-13) ,(17-19),(29-31) ,(41-43) ,(59-61), (71-73)  

*1 ते 50 मध्ये एकूण 6 जोड मूळ संख्यांच्या जोडी आहेत.

✍️ सहमूळ संख्या (सापेक्ष मूळ संख्या)

ज्या दोन किंवा अधिक संख्येने एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात.

*दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात.

*दोन क्रमागत नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतात.

*सहमूळ संख्यांचा मसावि एक असतो.

✍️ संयुक्त संख्या : (विभाज्य संख्या)

ज्या संख्येचे एक व ती संख्या या खेरीज आणखी विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात.

ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

*सर्वात लहान संयुक्त संख्या  4 ही आहे.

* 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे.

* 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त ही नाही.

✍️ त्रिकोणी संख्या :

दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

* 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या एकूण 13 आहेत.

*1 ते 50 पर्यंत त्रिकोणी संख्या 9 आहेत.

* 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91 या शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत.

*सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे.

*दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते.

✍️ चौरस संख्या : ( वर्ग संख्या)

*कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात.

*एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या चौरस संख्या असते.

* 1 ते 100 पर्यंत एकूण चौरस संख्या 10 आहेत.

* 1,4,9,16,25,36,49,64,81,100 या शंभर पर्यंत चौरस संख्या आहेत.

✍️ घनसंख्या :

एक संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केला असता आलेल्या गुणाकाराला त्या संख्येचे घन म्हणतात. आणि तीच घनसंख्या असते.

* 1,8,27,64,125,216,343,512,729,.... या घनसंख्या आहेत.

✍️ क्रमवाचक संख्या :

पहिला ,दुसरा ,तिसरा ,चौथा ,.....अशा संख्यांना क्रमवाचक संख्या असे म्हणतात.

✍️ क्रमिक संख्या : 

3,6,9,12,... किंवा 6,12 ,18,24,30,.. इत्यादी सारख्या अंतराने येणाऱ्या संख्यांना क्रमिक संख्या म्हणतात.

✍️ परिमेय संख्या :

p(p/q, q#0) यापूर्णांकाला या शून्य तर पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरी संख्या म्हणजे परिमेय संख्या होईल.

जी संख्या आवर्ती दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते ती परिमेय संख्या असते.

*सर्वात लहान आणि सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही.

✍️ अपरिमेय संख्या 

ज्या संख्या परिमेय नसतात त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात.

प्रत्येक अखंड आवृत्ती नसणारी दशांश मांडणी एक आणि एकच संख्या दर्शवते त्या संख्येस अपरिमेय संख्या म्हणतात.

✍️ वास्तव संख्या:

सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात.


संकलक: श्री राम गोवर्धन डोळे

यश तुमच्या हातात या शिष्यवृत्ती मार्गदर्शिकाचे

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडणे...

 स्पर्धा परीक्षा तयारी...

    पोलीस भरती परीक्षा ,तलाठी भरती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा ,मंथन परीक्षा यासाठी खास youtube चॅनल Ram Govardhan Dole हे चॅनल सबस्क्राईब करा.

आजचा व्हिडिओ : प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडणे .



 स्पर्धा परीक्षा तयारी

पोलीस भरती, तलाठी भरती ,विविध स्पर्धा परीक्षा ,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षा ,मंथन परीक्षा ,प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी उपयुक्त असे यूट्यूब चैनल Ram Govardhan Dole हे चैनल सबस्क्राईब करा.

आजचा व्हिडिओ : आरशातील प्रतिमा



 पोलीस भरती परीक्षा तयारी

पोलीस भरती परीक्षा, तलाठी भरती परीक्षा तयारी, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी या साठी खास you tube channel: Ram Govardhan Dole हे चॅनल सबस्क्राईब करा.

आजचा व्हिडिओ: विषय - बुद्धिमत्ता (आकृती मोजणे)



लसावि आणि मसावि स्पर्धा परीक्षा तयारी

 लसावि आणि मसावि यावर आधारित सराव प्रश्न स्पष्टीकरण सहित या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत..



 स्पर्धा परीक्षा तयारी

पोलीस भरती ,तलाठी भरती, विविध स्पर्धा परीक्षा ,शिष्यवृत्ती तयारी नवोदय प्रवेश तयारी, मंथन परीक्षा तयारी, इ. इत्यादी परीक्षांची तयारी करण्यासाठी खास युट्युब चॅनेल Ram Govardhan Dole हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा ,कमेंट करा इतर मित्रांना शेअर करा.

आजचा व्हिडिओ-विषय: बुद्धिमत्ता -संख्या मालिका पूर्ण करणे यावर आधारित प्रश्न स्पष्टीकरण सहित.